नांदेड,(प्रतिनिधी)-जुलै महिन्यात डॉक्टर बंसल यांच्या घरी झालेल्या चोरीची च्या गुन्हा नांदेड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. त्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त सुद्धा करण्यात आला आहे. सुरुवातीला या गुन्ह्यात आलेली तक्रार फक्त एक लाख 75 हजार चोरीची होती.
पद्मजा सिटी मध्ये राहणारे डॉक्टर बंसल हे 10 जुलै ते 14 जुलै आपल्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. 14 तारखेला परत आले तेव्हा त्यांच्या घराची कुलूप तोडलेले होते तपासणी केली असता चोरी झाल्याचे दिसले. त्या संदर्भाची तक्रार दिली तेव्हा फक्त एक लाख 75 हजार रुपयांची तक्रार घेण्यात आली होती पुढे पुरवणी जबाब या सदरात बंद असेल यांच्या घरातून 21 लाख रुपये कॅश आणि 35 तोळे सोने चोरीला गेल्याचा प्रकार पोलीस दप्तरी आला. नांदेड जिल्ह्यातील बरेच पोलीस अधिकारी या कामासाठी लागलेले होते. अखेर सुतावरून स्वर्ग गाठण्याची तयारी ठेवणाऱ्या पोलीस विभागाने या प्रकरणात शफी बिल्डर,अमीर पाशा, नंदू पाटील देवसरकर अशा तीन आरोपींना पकडले आहे. अजूनही काही चोर पकडायचे आहेत.पकडलेल्या चोरांकडून लाखो रुपये रोख रक्कम आणि बरेच सोने जप्त करण्यात आले आहे. शफी बिल्डरची सात लाख रुपयांची कार सुद्धा जप्त करण्यात आली आहे. शफी बिल्डर एक सामाजिक व्यक्ती म्हणून जगात वावरण्याचा प्रयत्न करताना दिसत होता.अनेक कार्यक्रमांमध्ये त्याने पोलिस अधिकाऱ्यांना बोलावलेले होते. मागे सुद्धा चार चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव आले होते. दोन महिन्यापासून या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांना अखेर यश आले. त्यांनी तीन चोरट्यांना पकडले आहे. यातील अमीर पाशाने 15 तोळे सोने कोणा तरी सोनाराकडे विकले आहे. त्याचा पत्ता मात्र अजून पोलीस शोधत आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस उप महा निरीक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक केले आहे.
