नांदेड(प्रतिनिधी)-एका 55 वर्षीय व्यक्तीला भरदुपारी धनेगाव येथे आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून 50 हजारांचा ऐवज फसवणूक करुन घेवून गेल्याचा प्रकार घडला आहे.
सर्जेराव प्रल्हाद कुलथे हे पुणे येथे राहतात. दि.13 सप्टेंबरच्या दुपारी 1 वाजेच्यासुमारास ते मौजे धनेगाव ता.जि.नांदेड येथे पायी जात असतांना दोन जण त्यांच्या समोर आले आणि आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून त्यांना सोने घालून फिरु नका असे सांगितले. त्यांच्या हातातील 10ग्रॅम सोन्याची अंगठी 40 हजार रुपये किंमतीची आणि मोबाईल 10 हजाराचा असा 50 हजारांचा ऐवज फसवणूक करून घेवून गेले आहेत. त्यांच्याकडे सोन्याचे पावती 40 हजारांची असेल. मात्र आज सोन्याचा दर 1 लाख 10 हजारांच्या जवळपास आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 889/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
नांदेड जिल्ह्यात रायचंद पोलीसांचा शिरकाव; गुन्हा दाखल
