लोहा(प्रतिनिधी)-लोहा-माळाकोळी रस्त्यावर एका 62 वर्षीय व्यक्तीची सायकल थांबवून चार जणांनी 61 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडला.
चंद्रकांत गिरदेव जोशी हे शेतकरी 13 सप्टेंबर रोजी आपल्या दुचाकीवर बसून आडंगा ते माळाकोळी असा सायकलवर प्रवास करत होते. त्यावेळी चार जणांनी संगणमत करून त्यांना रोखले आणि त्यांच्या खिशातील सोन्याची अंगठी 60 हजार रुपयांची व एक हजार रुपये रोख रक्कम असा 61 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. माळाकोळी पोलीसंानी ही घटना गुन्हा क्रमांक 163/2025 नुसार दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक मुळीक अधिक तपास करीत आहेत.
माळाकोळी रस्त्यावर 62 वर्षीय सायकल स्वाराला लुटे
