छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा”चे आयोजन  

 

नांदेड – महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” प्रभावीपणे राबविला जाणार आहे. हा उपक्रम मोहिम स्वरुपात तीन टप्यात महसूल विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

 

*पहिला टप्पा 17 ते 22 सप्टेंबर*

या कालावधीमध्ये पाणंद / शिवरस्त्यांना क्रमांक देण्याबाबतच्या महसूल विभागाच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे. अमरावती जिल्ह्यात जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख व उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या समन्वयातून पाणंद रस्ते मेंपिंगचा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर पाणंद रस्ते गाव नकाशावर चिन्हांकित करण्याची कार्यवाही करणे तसेच या मोहिमेत याव्यतिरिक्त पुढील नमूद बाबींवरही कार्यवाही करण्यात येणार आहे. शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे. ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक / वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे. शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमती पत्र घेणे. रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे. शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे याबाबींचा समावेश आहे.

 

*दुसरा टप्पा 23 ते 27 सप्टेंबर*

सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करणे. “सर्वासाठी घरे” या उपक्रमातंर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या पाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे. या उपक्रमासाठी अस्तित्वातील रहिवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करणे, (In Situ regulerisation of encroachment). महसूल विभाग शासन निर्णय 14 डिसेंबर 1998 मधील तरतुदीनुसार आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत असल्यास शहरातील जमिनीवरील गायरान नोंदी कमी करुन त्या जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणे तसेच आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत नसल्यास अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करणे.

 

पात्र लाभार्थ्यांना पटे वाटप मोहिमेत सर्वांसाठी घरे या योजनेतंर्गत शासकीय जमिनी वाटप केलेल्या / अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे बाटप करणे. खाजगी मिळकतधारकांना पट्टे वाटप करणे. रहिवासी प्रयोजनासाठी शासकीय जमिनी प्रदान केलेले मिळकतधारक. शासकीय जमिनीवरील घरांसाठीची अतिक्रमणे नियमानुकूल केलेले मिळकतदार.

 

*तिसरा टप्पा 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर*

नाविन्यपूर्ण उपक्रमात या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी यांनी स्थानिक गरजा, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अधिकाधिक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने नांदेड जिल्हयात पुढील तीन नाविन्यपुर्न उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्मशान भुमिसाठी आवश्यक जमीनी प्रदान करण्याची कार्यवाही करणे. Land bank अंतर्गत KML फाईल तयार करुन जीआयएस GIS द्वारे नकाशावर स्थापीत करणे. (Geo Fencing). व्हॉटसॲपद्वारे प्राप्त तक्रारी संकलित करुन तक्रारीचे निवारण करणे.

याप्रमाणे 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” साजरा करण्याचा उपक्रम मोहिम स्वरुपात महसूल विभागाकडुन जिल्हयात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!