नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
कंधार (प्रतिनिधी)- राज्य महामार्गात 100 फूट जमीन जास्त घेण्यात आल्याचा आरोप घोडज येथील तेलंगे कुटूंबा कडून करण्यात आला आहे. याबाबतच्या तक्रारीनंतर देखील रस्त्याचे काम सुरु झाल्याने शेतकरी मायलेकाने रस्त्याचे काम अडवित विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.सद्या यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णयाल्यात उपचार सुरु असल्याची पोलीस प्रशासनानी दिली.
कंधार तालुक्यातील घोडज येथील शेतकरी इंदरबाई रामा तेलंग वय 65 वर्ष व्यंकटी रामा तेलंग वय 45 वर्ष रा. घोडज ता. कंधार या शेतकर्यांचे घोडज येथील रस्त्यावावत हरकत घेतली होती. कंधार ते लोहा असा राज्य महामार्ग जात आहे. यात कंधार तालुक्यातील घोडज येथील इंदरबाई तेलंगे व व्यंकटी तेलंगे यांनी या कामावर हरकत घेऊन 2022 व 2024 साली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. माडावरील पाणी आमच्या शेतात घुसून
आमचे शेताचे नुकसान होईल त्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन अधिकार्यांनी दगडी भिंत बांधण्याचे आश्वासन दिल्यानंतर काम सुरू करण्यात आले. परंतु पुन्हा हरकत घेतल्याने काम ठप्प झाले. घाट संपल्यानंतरचा हा भाग अपघातप्रवण असल्याने रस्ता अरुंद करता येणार नाही, असे सार्वजनिक वांधकाम विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्यात
आले. बुधवारी सायंकाळी शेतकरी इंद्रावाई रामा तेलंग व व्यंकट रामा तेलंग या मायलेकांनी आमच्या शेतात जबरदस्तीने काम सुरू असल्याचा आरोप करत संतापाच्या भरात विषारी द्रव्य प्राशन केले. बंदोवस्तात असलेल्या पोलिसांनी तत्काळ तत्परता दाखवत दोघांना कंधार ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथे डॉ. राजू टोम्पे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी कुटुंबियांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर मनमानी कारभाराचा आरोप केला आहे. पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मायलेकाचा जीव वाचला. आत्महत्या हा मार्ग नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे धीर देत पोलिसांनी उपचारात मदत केली.
राज्य महामार्गात जमीन जात असल्या प्रकरणी माय-लेकराचा विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न
