नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर तालुक्यात 8-9 सप्टेंबरच्या रात्री 50 वर्षीय महिलेचा खून झाला होता. त्यातील मारेकर्याला हिमायतनगर पोलीसांनी 24 तासात अटक केली आहे. हा खून अनैतिक संबंधामुळे घडला होता.
मोतीराम धोंडीबा शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अन्नपुर्णा कोंडीबाराव शिंदे (50) या महिलेचा सुनिल भारत हातमोडे या 30 वर्षीय व्यक्तीने खून केला होता. हा घटनाक्रम दुधड ता.हिमायतनगर येथे घडलेला आहे. 9 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा गुन्हा क्रमांक 109/2025 दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच. उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस.हाके आणि डॅनिएल बेन यांच्या मार्गदर्शनात हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक अमोल भगत, सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वाठोरे, पोलीस उपनिरिक्षक शेख अजीमोद्दीन, पोलीस अंमलदार शंकर नलबे, नामदेव जाधव, बालाजी पाटील, शाम नागरगोजे, विजय कलाले, चंद्रकांत आरकिलवार, ज्ञानेश्र्वर जिंकलवार यांनी मेहनत घेवून सुनिल भारत हातमोडे(30) रा.दुधड ता.हिमायतनगर यास पकडले. सुनिल हातमोडे आणि मयत महिला यांचे आपसात अनैतिक संबंध होते. महिलेने गाव सोडून दुसरीकडे जाऊन राहण्याचा तगादा लावल्यामुळे हा खून घडला. हिमायतनगर पोलीसांनी 24 तासात या गुन्हेगाराला अटक करून उत्कृष्ट कार्यवाही केलेली आहे.
अनैतिक संबंधातून 50 वर्षीय महिलेचा खून
