रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपन्यानी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड –  राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान- कडधान्य- गहू, हरभरा, पौष्टिक तृणधान्य- रब्बी ज्वारी,राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया- करडई, सुर्यफुल व राष्ट्रीय कृषि विकास महाराष्ट्र मिलेट मिशन योजनेंतर्गत- ज्वारी या घटकांतर्गत रब्बी हंगामात गहू, हरभरा,ज्वारी, करडई व सुर्यफुल या  या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पीक प्रात्यक्षिकासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र आहेत. गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा. ही सुविधा 2 सप्टेंबर 2025 पासुन उपलब्ध आहे. संकेतस्थळावर बियाणे वितरण फलेक्सी घटक, औषधे आणि खते या टाईल अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येईल.

तरी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी रब्बी हंगाम पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटीवर अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!