नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धर्माबादमधील श्रीकृष्ण रेस्टॉरंटच्या शेजारी असलेल्या सागर बार ऍन्ड रेस्टॉरंटचे शटर अर्धवट वाकवून चोरट्यांनी त् यातून विदेशी दारु आणि रोख रक्कम चोरून नेली आहे.
माधव लक्ष्मण सोनटक्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे सागर बार ऍन्ड रेस्टॉरंट 8 सप्टेंबरच्या रात्री 2.55 ते 3.04 वाजेदरम्यान कोणी तरी तीन चोरट्यांनी त्यांचे शटर अर्धवट उघडून त्यातून विदेशी दारु आणि रोख रक्कम असा 55 हजार 820 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. धर्माबाद पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 268/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार घेवारे अधिक तपास करीत आहेत.
धर्माबादमध्ये बिअरबार फोडून विदेशी दारु व रोख रक्कम चोरली
