नांदेड(प्रतिनिधी)-मुंबईमधील तीन महिला आणि एक पुरूष नांदेडच्या डॉक्टरांना अडीच लाखांची खंडणी मागत असल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या डॉक्टर साहेबांनी या तिन खंडणीखोरांना दीड लाख रुपये दिलेले आहेत. त्यांनी चुक केलीच नसेल तर मग दिड लाख रुपये का दिले हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
नांदेड येथील केसराळे हॉस्पीटल यशवंतनगर येथील डॉ.संतोष शामसुंदर केसराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत केसराळे हॉस्पीटल भुखंड क्रमांक 57 मध्ये प्रिया गाडे रा.नवी मुंबई रोड पाली, पनवेल, विजय पवार रा.वांवजे पनवले, शिल्पा मस्के आणि साक्षी मस्के रा.डोंबवली हे त्यांच्या घरात घुसले आणि तुमच्या विरुध्द खानदेश्वर पोलीस ठाणे येथील गुन्ह्याचा एक एफआयआर दाखवून साक्षी मस्के हिचा गर्भपात झाला आहे. ती आपल्या दवाखान्यात आली होती. जर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाहीत तर डॉ.संतोष केसराळे विरुध्द पोलीस केस करण्याची आणि दवाखान्याची तोडफोड करण्याची धमकी दिली. त्यावेळेस दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर सतत 2 लाख 50 हजारांची मागणी करून पैसे न दिल्यास वकीलामार्फत गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी दिली. शिवाजीनगर पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 340/2025 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक थडवे अधिक तपास करीत आहेत.
उच्च शिक्षण घेतलेल्या डॉ.संतोष केसराळे यांनी जुलै महिन्यात घडलेल्या आणि एफआयआरमध्ये लिहिलेल्या शब्दांप्रमाणे त्यांनी दीड लाख रुपये दिलेत. त्यांनी कोणाचा गर्भपात केलाच नसेल तर त्यांना भिण्याचे कारण काय? दीड लाख रुपये देण्याचे कारण काय? या दोन प्रश्नांची उत्तरे मात्र दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यानंतर शोधणे अत्यंत गरजेचे आहे.
गर्भपाताचा आरोप करुन डॉ.केसराळेंना खंडणीची मागणी
