नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी मौजे कामळज येथे गोदावरी नदीच्या पात्रातून चार फायबर बोट 60 लाख रुपये किंमतीच्या आणि चार छोटे इंजिन 40 लाख रुपयांचे असा 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरिक्षक संजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.9 सप्टेंबर रोजी सायंकाळी मौजे कांबळज ता.लोहा येथून वाहणाऱ्या गोदावरी नदी काठी कांबळज, येळी आणि शंखतिर्थ या परिसरातून इंजिनच्या सहाय्याने रेती उपसा करून बोटीच्या सहाय्याने ती साठवून केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर उस्माननगर, कुंटूर, मुदखेड येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार तसेच महसुल अधिकारी व कर्मचारी यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी नदीपात्रात इंजिन लावून रेती उपसा होत होता आणि तो बोटींमध्ये भरून काठावर साठवण केला जात होता असे चार इंजिन आणि चार मोठ्या बोटी एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी या ठिकाणी जप्त केला आहे.
या प्रकरणी शंकर प्रकाश, संतोष ज्ञानेश्र्वर भरकडे दोघे रा.कऊलगाव, संजय शेषराव जाधव, रा.चिंचोली, भगवान पंडीत भोग रा.मारतळा ता.लोहा या चार जणांविरुध्द बी.एन.एस.कायदा आणि खाण खनिज अधिनियम प्रमाणे गुन्हा क्रमांक 237/2025 दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही उस्माननगर सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस उपनिरिक्षक गजानन गाडेकर, हंबर्डे, गंगाधर चिंचोरे, प्रकाश पेद्देवाड, माधव पवार, जुन्ने आणि राठोड यांनी केली आहे.

