उमरगा (ता. धाराशिव) –येथे आज सदगुरू कृपा सदनमध्ये शांतीदूत परिवारातर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक श्री. प्रल्हाद सूर्यवंशी (उमरगा पोलीस स्टेशन) व विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य (से.नि.) डॉ. विठ्ठल जाधव IPS, तसेच शांतीदूत परिवाराचे मार्गदर्शक उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. ऋतुजा जीवनराव जाधव, डॉ. तुषार तुकाराम माणिकवार व श्री. दयानंद विठ्ठलराव (सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, संभाजीनगर) यांना त्यांच्या दैदिप्यमान यशाबद्दल शांतीदूत परिवार सेवा रत्न पुरस्कार प्रदान करून त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सौ. विद्या ताई जाधव (संस्थापक अध्यक्षा, शांतीदूत परिवार), प्राचार्य सोमशंकर महाजन (तालुका अध्यक्ष, उमरगा), प्रा. जीवन जाधव (अध्यक्ष, शांतीदूत परिवार मराठवाडा), प्रा. अभयकुमार हिरास (जिल्हा अध्यक्ष, धाराशिव), श्याम पाटील (अध्यक्ष, शांतीदूत परिवार चिंचोली), पत्रकार श्री. लक्ष्मण पवार (प्रसिद्धी प्रमुख), पत्रकार श्री. नसीरोदीन फकीर (अध्यक्ष, शांतीदूत परिवार जकेकुर), तसेच शांतीदूत परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी प्रमुख पाहुण्यांसह शांतीदूत परिवार पदाधिकारी व सत्कारमूर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले. एक हात मदतीचा, ध्यास माणुसकीचा.

