निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप; विद्यार्थ्यांनी केली तहसीलदार यांच्याकडे तक्रार नांदेड –अर्धापूर येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहातील जेवणात चक्क आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वस्तीगृहात सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी शासन लाखो रुपये खर्च करत असते. परंतु अनेक ठिकाणच्या वस्तीगृहात कुठल्या सुविधा मिळत नसल्याचा प्रकार समोर येत आहे. असाच काहीसा प्रकार नांदेडच्या अर्धापूर येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात आढळून आला आहे. या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये चक्क आळ्या निघाल्या. तर दररोजचे जेवण हे निकृष्ट दर्जाचे दिले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याची तक्रार विद्यार्थ्यांनी अर्धापूर तहसीलदारांकडे केली आहे. वस्तीगृहातील कर्मचारी देखील विद्यार्थ्यांना चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप देखील या विद्यार्थ्यांनी केला आहे.या प्रकारामुळे मात्र विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित वस्तीगृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2025/09/VID-20250909-WA0010.mp4 Kanthak Suryatal Post Views: 596 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सदगुरू कृपा सदन उमरगा येथे सवा रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न; शांतीदूत परिवाराकडून दैदिप्यमान कार्यकर्त्यांचा सन्मान महापालिकेसमोर शुक्रवारी ठाकरे पक्षाचे बोंब मारो आंदोल-मारावारा