नांदेड(प्रतिनिधी)-गणेश विसर्जनाच्या दिवशी गाडेगाव जवळ आसना नदी पात्रात बुडालेल्या दोन युवकांपैकी एकाचे प्रेत त्रिकुट गावाजवळ नदी पात्रात सापडले आहे. अद्याप अजूनही दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
दि.6 सप्टेंबर 2025 रोजी सर्वत्र उत्साहात विघ्नहत्याचे विसर्जन सुरू असतांना गाडेगाव ता.नांदेड येथे आसना नदी पात्रात आपल्या गावातील गणेश मंडळाच्या गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यासाठी योगेश गोविंदराव उबाळे (17) आणि त्यांचा चुलत भाऊ बालाजी कैलास उबाळे (18) हे दोन आणि त्यांच्यासोबत अजून एक तिसरा पाण्यात उतरले होते. आणि दुर्देवाने ते पाण्यात बुडाले. ते तिघे एकदुसऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करत होते. त्यातील एकाला गावकऱ्यांनी वाचविले. मात्र हे दोन बालाजी आणि योगेश वाहून गेले. 40 तासानंतर वाहुन गेलेल्या दोघांपैकी योगेश गोविंदराव उबाळे (17) या युवकाचे प्रेत त्रिकुट गावाजवळ आसना नदीच्या काठावर सापडले आहे. अजूनही दुसरा बंधू बालाजी उबाळेचा शोध सुरू आहे.
संबंधीत बातमी…
श्री गणपती विसर्जन सोहळ्यात विघ्न;गाडेगावचे दोन युवक पाण्यात बुडाले ;अद्याप सापडले नाहीत
