नांदेड,(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची बदली १४ ऑगस्टपूर्वी होणार असल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उमाप यांना बदली झालीच नाही पण सहायक पोलीस निरीक्षक पांढरी बोधनकर यांना पुन्हा लिबगाव पोलीस ठाण्यातच कार्यरत ठेवण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक कार्यालयाने घेतला आहे.
शाहजी उमाप यांच्या बदली विषयावर यापूर्वी वास्तव न्यूज लाईव्हने बातमी केली होती. झाल्यानंतर पांढरी बोधनकर यांनी वास्तवच्या संपादकांना बेकायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र, त्या नोटीसीला ठोस उत्तर देण्यात आले होते. तरीही, पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या संदर्भानुसार नांदेडच्या पोलीस अधीक्षकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचीच नियुक्ती पुन्हा लिबगाव ठाण्यात केली आहे. यापूर्वी बोधनकर हे लिमगाव येथे कार्यरत असताना त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई झाली होती. त्या वेळी काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, तेव्हा बोधनकर यांची रवानगी नियंत्रण कक्षात करण्यात आली होती.त्यात आदेशात संलग्न असे शब्द आहेत.
नवीन माहितीनुसार, ५ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या ‘जावक क्र. ४२३/२०२५ अन्वये बोधनकर यांना त्यांच्या मूळ पदावर म्हणजे लिबगाव पोलीस ठाण्यातपरत करण्यात आले आहे असे शब्द लिहिलेले आहे. या आदेशाची प्रत पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र कार्यालयालाही पाठवण्यात आली आहे.
लिमगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पद अस्तित्वात असले तरी ते पद का भरले जात नाही, याची विचारणा कोणीच नेता करत नाही.त्यामुळे लिंबगावचा कार्यभार कायम सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडेच सोपवला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे, श्री गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी हा बदली आदेश जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, १४ ऑगस्टपूर्वी शाहजी उमाप यांची बदली होणार असून मी पुन्हा लिमगाव पोलीस ठाण्यातच येणार,” असा प्रचार करणाऱ्यांचा सहायक पोलीस निरीक्षक पंढरी बोधनकर यांचा अंदाज अर्धवट खरा ठरला. शहाजी उमाप यांची बदली झाली नसली तरी त्यांची नियुक्ती पुन्हा लिमगाव ठाण्यातच करण्यात आली आहे.
संबंधित बातमी…
14 ऑगस्ट पर्यंत शहाजी उमाप यांची बदली होणार?; एपीआयचे प्रसारण
