मालवाडा (तालुका माहूर), घाटी (तालुका किनवट) आणि हिमायतनगर परिसरात तीन चोऱ्यांच्या घटनांमध्ये दोन लखनपेक्षा जास्त ऐवज चोरीला गेला आहे.पोलिसांनी या घटनांचा तपास सुरु केला आहे.
मालवाडा – घरात चोरी
29 ऑगस्ट 2025 रोजी रात्री साडेबारांपासून पहाटे पाच वाजेपर्यंत मालवाडा येथील समीर महबूब पलंगतोड यांच्या घरात चोरी झाली. त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रक्कम 1,38,500 रुपये आणि एक मोबाईल (25,000 रुपये किमतीचा) चोरून नेला. एकूण चोरीचा आकडा 1,63,500 रुपये आहे. समीर महबूब पलंग तोड यांनी दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
घाटी (किनवट) – बौद्ध विहारातील चोरी
घाटी तालुका किनवट येथील धम्मचक्र बौद्ध विहारात 21 आणि 22 ऑगस्ट दरम्यान चोरी झाली. निखिल अरविंद गायकवाड आणि शरण संतोष भवरे या दोन आरोपींनी बौद्ध विहाराच्या खिडकीतून प्रवेश केला आणि दानपेटी फोडून 50,000 ते 60,000 रुपये चोरीला घेतले. याप्रकरणी घाटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कोळी समाजात मुंडे अधिक तपास करत आहेत.
हिमायतनगर – विद्युत ट्रांसफार्मर चोरी
28 आणि 29 ऑगस्ट दरम्यान हिमायतनगर ते बोरगडी रस्त्यावर महबूब शेख यांच्या फार्म हाऊसजवळ 15 केवीचे विद्युत ट्रांसफार्मर चोरीला गेला. ट्रांसफार्मर 75,000 रुपये किमतीचा होता. महबूब शेख यांनी दिलेल्या तक्रारीवर हिमायतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आमदार नागरगोजे अधिक तपास करीत आहेत.
या तीन घटनांमध्ये पोलिसांनी संबंधित ठिकाणी गुन्हे दाखल केले असून, चोरट्यांना पकडण्यासाठी तपास सुरू केला आहे.
