गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती मोहीम 

 

नांदेड  – जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांना गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सीएसआर फंडामधून स‍िजेंन्टा इंड‍िया ल‍ि. कंपनी व महाराष्ट्र शासन कृष‍ि व‍िभाग यांच्या संयुक्त व‍िघमानाने गुलाबी बोंडआळी अभ‍ियान जनजागृती रथाची 15 ऑगस्ट पासून सुरवात झाली आहे. या जनजागृती रथाचे उद्घाटन ज‍िल्हा अध‍िक्षक कृष‍ि अध‍िकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. या जनजागृती मोह‍िमाचा ज‍िल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ज‍िल्हा अध‍िक्षक कृष‍ि अध‍िकारी यांनी केले आहे. यावेळी कृष‍ि उपसचांलक श्री वानखेडे, ज‍िल्हा गुणन‍ियंत्रण न‍िरीक्षक श्री पेकम व प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्रीमती गुंजकर यांच्या उपस्थ‍ितीत पार पडले. यावेळी कंपनीचे प्रत‍िन‍िधी सुद्धा उपस्थ‍ित होते.

 

सदर मोहिमेची आत्तापर्यंत नांदेड, धर्माबाद, उमरी, ब‍िलोली, नायगाव या तालुक्यामधील व‍िव‍िध गावांमध्ये गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माह‍िती पत्रक वाटून जनजागृती रथाद्वारे जनजागृती केलेली आहे. ज‍िल्हयातील उर्वरीत सर्व तालुक्यात वेगवेगळया गावामध्ये टप्याटप्याने जनजागृती रथ फ‍िरणार असून मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार आहे. गुलाबी बोंडआळी संदर्भात शेतीशाळेचे सुद्धा आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये शेतक-यांनी गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व‍िव‍िध उपयोजनेची माह‍िती सदर शेतीशाळेत म‍िळणार असून त्या शेतीशाळाचा सुद्धा शेतक-यांनी लाभ घ्यावा. एक ज‍िल्हास्तरीय व तीन तालुकास्तरीय गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यशाळा आयोज‍ित करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!