नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील हैदरबाग नंबर एक परिसरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या नोकराने विक्रीतून जमा झालेल्या पैशांचा हिशोब न देता थेट कार्यालयातील २ लाख ७० हजार रुपये चोरून नेल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
महंमद सलीम अहमद हुसेन यांनी इतवारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शेख साहेब शेख अजीम (रा. लक्ष्मीनगर) हा हैदराबाद नंबर एक येथील पेट्रोलियम पंपावर काम करतो. त्याने पेट्रोल आणि डिझेल विक्री करून जमा झालेल्या रकमेचा हिशोब न देता कार्यालयात ठेवलेले दोन लाख सत्तर हजार रुपये चोरून नेले.या प्रकरणी इतवारा पोलिसांनी गुन्हा क्र. २८०/२०२५ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार वाजेद या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
