
नवीन नांदेड (प्रतिनिधी): मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलनाचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना दि.26 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी ता. अंबड जि.जालना या ठिकाणी मुक्कामासाठी बोलवले होते.
दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली येथून मनोज जरांगे पाटील समाज बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघणार होते, त्याच अनुषंगाने पूर्ण मराठवाड्यात गेले दोन महिने झाले मराठा सेवकांनी वाड्या–तांडे अक्षरशः झोडपून काढले.
मराठा समाजाची आरक्षणाची मागणी कशी रास्ता आहे, ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण का हव आहे, मराठा समाजाची खालवलेली परिस्थिती, विद्यार्थ्यांची दशा सर्वच गोष्टी या विचार करायला भाग पाडणाऱ्या नक्कीच आहेत.
मराठा समाज आज घडीला हतबल झाला असून मराठा समाजाची आर्थिक विवंचना दूर करायचे असेल सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील तरुण दिसला पाहिजे यासाठी सर्व गरजवंत मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे खंबीर उभा आहे याची प्रचिती अनेक वेळा होताना दिसत आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चावडी बैठकांची आयोजन मराठा सेवकांनी केले प्रतिसाद ही उस्फूर्त भेटला .
मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी आता चंग बांधले असून मराठा आरक्षण घेऊनच परत येणार असा निर्धार दि. 26 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेल्या मराठा सेवकांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन घेऊन सोळा तालुक्यातील लाखो समाज बांधव मुंबईच्या दिशेने रोजच्या जीवनावश्यक वस्तूंसह रवाना झाले आहेत. गणेश चतुर्थीचा सण असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यातील मराठा सेवकांना अंतरवालीची आस लागली होती. विघ्नहर्ता गणराया मराठा आरक्षणातले सगळे विघ्न दूर करो ही प्रांजळ प्रार्थना करून यंदाचे गणपती विसर्जन अरबी समुद्रात करण्याचा मानस मराठा सेवकांनी केला.
