नांदेड- नांदेड जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पार पडली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली. या सोडतीत पंचायत समिती निहाय सभापती पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. भोकर- अनुसूचित जाती (महिला), हिमायतनगर- अनुसूचित जाती, किनवट- अनुसूचित जाती, उमरी- अनुसूचित जमाती, मुदखेड- अनुसूचित जमाती (महिला), नांदेड- नागरिकांचा मागास प्रवर्ग, हदगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग, नायगाव खै.- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), लोहा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), देगलूर- सर्वसाधारण (महिला), मुखेड- सर्वसाधारण (महिला), बिलोली- सर्वसाधारण (महिला), धर्माबाद- सर्वसाधारण (महिला), कंधार- सर्वसाधारण, अर्धापूर- सर्वसाधारण माहूर- सर्वसाधारण. या सोडतीच्या प्रक्रियेस संबंधित अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण निश्चित झाले आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,187 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation औषधी दुकानामधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप खरेदी करू नये : अन्न व औषध प्रशासन गांधींना नाकारलं, मचाडोना स्वीकारलं: हेच का शांततेचं मापदंड?