नांदेड– महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारुती शिकारे हे 24 व 25 ऑगस्ट 2025 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील गवंडी, बेलदार या जाती संदर्भात बैठक, सुनावनी कामकाजासाठी तर सदस्य डॉ. गोविंद काळे हे 26 ऑगस्ट 2025 रोजी लातूर जिल्ह्यातील गवंडी, बेलदार जाती संदर्भातील सुनावनीसाठी येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार 24 ऑगस्ट 2025 रोजी सायं 6 वा. खाजगी वाहनाने शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व मुक्काम. सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत दि.1 जुलै 2024 ते 30 जून 2025 या कालावधीमधील इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती संवर्गास वितरीत केलेली जात प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्र यांचा आढावा तसेच जिल्ह्यातील आश्रमशाळांचा आढावा. स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड. दुपारी 12.30 ते 1.30 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील गवंडी/बेलदार या जात समुहांच्या प्रतिनिधीशी चर्चा व सुनावनी. दुपारी 1.30 वा. भोजन. दुपारी 2 ते सायं. 6 वाजता बेलदार, गवंडी जात समुहाची क्षेत्रपाहणी. सायं. 7 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
