नांदेड (प्रतिनिधी)-मुखेड तालुक्याच्या सिमेलगत असलेल्याा धडकनाळ येथील नागरीक ऍटोतून प्रवास करत असतांना ऍटोसह हे नागरीक पुरात वाहुन गेले. यातील 3 नागरीकांना बचाव कार्याच्या पथकाने सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले असून यात एका पुरूषासह तीन महिला पाण्यात वाहुन गेल्या होत्या. यात चार जण अजूनही बेपत्ताा असल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर रविवारी रात्री अचानक आलेल्या पावसाच्या महापुरात हसनाळ येथील अनेक नागरी पुरात अडकले होते. त्यातील सात जण बेपत्ता झाले असून त्यातील पाच जण मृत अवस्थेत सापडले आहेत. बचाव कार्याकडून यांना बाहेर काढण्यात आले आहे.
मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य व अतिवृष्टीमुळे लेडीं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी लेंडी नदीच्या पाणी पातळीत भयंकर वाढ होऊन अनेक गावांमध्ये पाणी शिरून पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. यात तर 18 ऑगस्ट रोजी मुखेड तालुक्यातील वा-हाळी महसूल मंडळात एकाच दिवशी 354.8 मिमी व मुक्रमाबाद मंडळात 206.8 मिमी इतके विक्रमी पाऊस झाला. 19 ऑगस्ट रोजी पुरस्थिती नियंत्रणात आली असली तरी पुनर्वसित रावणगाव, भासवाडी, भिंगोली व हसनाळ या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे पुराच्या पाण्यात शेकडो जण अडकले आहेत. रावणगाव येथे अंदाजे 225 नागरिक पाण्याच्या वेढ्द्यामध्ये अडकलेले होते त्या सर्व नागरिकांना शोध व बचाव पथकाककडून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हसनाळ येथे अंदाजे 8 अडकलेल्या नागरिकांना शोध व बचाव पथकाकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. सैन्य दलामार्फतही वैद्यकीय शिविर लावून आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. भासवाडी येथे सुमारे 20 नागरिक सुखरूप बाहेर काढण्यात आले. भिंगोली येथे सुमारे 49 नागरिक सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. मुखेड तालुक्यात पुरामुळे लहान मोठी एकूण 52 जनावरे दगावली आहेत. मयत व निराधार कुटूंबाची यादी व पंचनामे मदत देण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात येत आहे.
दरम्यान विविध पथकांकडून मोठ्या प्रमाणात पुरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू असतांनाच मुखेड-उदगीर तालुक्याच्या सीमेवरील धडकनाळ येथील पुलावरून रात्री 1.40 वा. 4 पुरूष, 3 महिला 1 कार व एका ऑटोसहित वाहून गेले. त्यापैकी पुरुषांना स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत वाचविण्यात यश आले आहे. परंतू अजुनही एका पुरुषासह 3 महिला असे 4 जण वेपत्ता आहेत. हसनाळ गावात मंगळवारी आणखी एका महिलेला मृतदेह सापडला आहे. यामुळे येथील मृतांचा आकडा आता 4 वर गेला आहे.
बचाव कार्याला वेग; 300 जणांची सुटका
मुखेड तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्या शोध व बचाव पथक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस, अग्नीशमन दल, शीघ्र प्रतिसाद दल व स्थानिक शोध व तत्परतेमुळे जवळपास 300 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून सर्वजण सुरक्षित आहेत. सर्व विस्थापित नागरिकांची तात्पुरती निवास, भोजन व वैद्यकीय सुविधा विषयक व्यवस्था करण्यात आलेली आहे. उपविभागीय अधिकारी देगलूर व तहसीलदार मुखेड हेसुध्दा घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्य करत आहेत. जिल्हा प्रशासन पूर्णतः सतर्क असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.
