नांदेडमध्ये उद्या ‘इंद्रधनू २०२५’ तृतीयपंथी सांस्कृतिक महोत्सव

 

नांदेड  : –महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व सप्तरंग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इंद्रधनू २०२५’ हा तृतीयपंथी विशेष सांस्कृतिक महोत्सव रविवार १७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे पार पडणार आहे.

तृतीयपंथी समाजातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून महोत्सवाचे उद्घाटन विविध शासकीय व प्रशासकीय मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांत पुण्याचे जगदीश भोसलेंचे वर्ध्याचे समीर मेश्रार यांचे कथ्थक नृत्य, अमरावतीच्या शुभम सोनुनेचे घडा लोकनृत्य, मुंबईच्या विद्यासागर व अक्षया पुणेकर यांचे रंगतदार लावणी सादरीकरण, नागपूरच्या मिशन विश्व ममत फाउंडेशनकडून मंगलमुखींचे देवी स्तोत्र, बुलढाण्याच्या नटराज लोककला संचाचे भारुड तसेच गौरव हजारिक लिखित व दिग्दर्शित ‘निर्वाण’ हे नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन प्रगती हाटे (गंगा), मुंबई करतील.

तृतीयपंथी समाजातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना योग्य प्रोत्साहन मिळावे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या पुढाकारातून साकारलेला हा उपक्रम नांदेडकरांसाठी एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!