नांदेड(प्रतिनिधी)-जैविक खताच्या संदर्भाने तिन दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे चॉकलेट देवून उपोषणकर्त्याला उपोषणापासून दुर करण्यात आले खरे पण या चौकशीसमितीमध्ये ज्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. ते अधिकारी मागील अनेक वर्षापासून या जैविक खतांचा काळा बाजार करणाऱ्यांना मदतच करत आले अआहेत. मग खऱ्या अर्थाने कार्यवाही कोण करणार. या प्रकरणात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी स्वत: लक्ष घातले होते. पण हा कारभार लालफितीतअडकला तर त्याचा परिणाम पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या न्यायावरच होणार आहे.
नांदेड येथील धनराज बद्रीनारायण मंत्री यांनी एक उपोषण सुरू केले होते. त्यांच्या मागणीनुसार जैविक खतांचा काळाबाजार होतो आणि तो सुध्द रेल्वेच्रूा रुळांवर अर्था रॅकपॉईंटरहोतो. म्हणजे कंपनीकडून आलेले खत दुकानात आणलेच जात नाही. आणि तेथल्या तेथेच जादा दराने उुसऱ्यां विकले जाते. या संदर्भाने 12 ऑगस्ट रोजी मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली . परंतू त्या बैठकीतील अधिकारी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद डॉ.निलकुमार येतवाडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरिक्षक, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय ए.ए.पेकम, कृषी अधिकारी गुणनियंत्रण तालुका कार्यालय मुदखेडचे जे.वि.पवार, कृषी अधिकारी गुणनियंत्रण तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्धापूर येथील श्रीमती एम.डी.भुगरे यांनी त्या चौकशीत सहभाग घेतला. परंतू समाधान न झाल्याने मंत्री यांनी आपले उपोषण सुरू केले. पण दोन दिवसानंतर स्वातंत्र्य दिन होता. म्हणून मंत्री यांना तुमची चौकशी पुन्हा करू असे चॉकलेट देवून त्यांचे उपोषण समाप्त करून घेण्यात आले आणि तिन दिवसात तुम्हाला नवीन चौकशी अहवाल देवू असे सांगितले.
गम्मत पाहा 15, 16, 17 हे तीन दिवस सुट्ट्या आहेत. म्हणजे तीन दिवसात काही शक्य होणार नाही. ज्या खताच्या काळ्या बाजाराबद्दल धनराज मंत्री यांचा आरोप आहे. त्या खताच्या काळ्या बाजाराला साथ देणारे अधिकारीच आता चौकशी अधिकारी आहेत. म्हणजे काय निघणार या चौकशीतून एकूणच हा विषय शेतकऱ्यांशी संबंधीत असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी स्वत: लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्यदरात, योग्य वेळेत जैविक खत मिळेल याची सोय करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नाही तर आजच्या नवीन भारतामध्ये सुध्दा तेच चालले आहे. जे आजपर्यंत चालत आले आहे. त्यात काही बदल घडेल अशी या चौकशी समितीच्या सदस्यांना पाहुन तरी वाटत नाही.
संबंधित बातमी…
जैविक खतांच्या काळाबाजाराविरोधात धनराज मंत्री यांचे उपोषण; प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन
