नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक लोपामुद्रा आणेराव यांनी आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाच्या दिवशीच टांझानिया देशातील सर्वात उंच असलेले किलमांजरो हे शिखर सर करून तेथे तिरंगा झेंडा फडकावला.

नांदेड येथून निघालेल्या लोपामुद्रा आणेराव यांनी 11 ऑगस्ट रोजी किली मांजरो या 5 हजार 895 मिटर उंच शिखरावर जाण्याची सुरूवात केली. दिवसभर चालणे, रात्री मुक्काम करणे, पुन्हा दिवसभर चालणे अशा पध्दतीने त्या भागातील पर्यावरणाची सवय करून घेतली आणि समुद्रसपाटीपासून 19 हजार 341 फुट उंच असलेल्या या शिखरावर भारतीय तिरंगा ध्वज आणि महाराष्ट्र पोलीसांचा ध्वज फडकावला. त्यांच्यासोबत राज्यातील इतरही काही पर्वतारोही गेले होते. पण पोलीस दलातून त्या एकट्याच होत्या. आफ्रीकेतील सर्वात उंच हे शिखर आहे. दगड,धोंडे, बर्फ यांच्यामध्ये चालत हे किलामांजरो पर्वत पार करावे लागते. लोपामुद्रा आणेराव यांनी हे शिखर पार करून इतरांसाठी एक आदर्श तयार केला आहे. लोपामुद्रा आणेराव या उस्माननगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्यासह अनेकांनी त्यांचे या कामगिरीसाठी कौतुक केले आहे. वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा लोपामुद्रा आणेराव यांचे अभिनंदन करत आहे.
संबंधीत बातमी….
पोलीस अंमलदार लोपामुद्रा आनेराव टांझानियाचे शिखर सर करण्यासाठी रवाना
