पोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी, पोलीस उपमहानिरिक्षक प्रमोद शेवाळे यांना राष्ट्रपती पदक

देशभरातील 1090 जणांना राष्ट्रपती पदक; महाराष्ट्राच्या 49 जणांचा समावेश

नांदेड(प्रतिनिधी)-भारतातील सर्व राज्य आणि केंद्र शाशित प्रदेश मध्ये काम करणाऱ्या पोलीस, अग्नीशमन दल, गृहरक्षक दल, सिव्हील डिफेन्स यामध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला मेडल जाहीर केले जातात. त्यात मेडल फॉर गॅलेंट्री (जी.एम.), प्रेसिडेंटस्‌ मेडल फॉर डिसटींगविश सर्व्हीस(पीएसएम) आणि मेडल फॉर मेडिटोरियस सर्व्हीस (एमएसएम) दिले जातात. यंदा देशभरात 226 जीएम, 89 पीएसएम आणि 635 एमएसएम दिले गेले आहेत. अग्नीशमन दलातील लोकांना एकूण 61 पदके देण्यात आली आहेत. होमगार्ड आणि सिव्हील डिफेन्सला 45 पदके, इतर सेवांना 33 अशा प्रकारे एकूण 233 जीएम, 99 पीएसएम आणि 758 एमएसएम जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला 7 जीएम, 3 पीएसएम आणि 39 एमएसएम अशी 49 पदके प्राप्त झाली आहेत.

देशभरात दरवर्षी जाहीर होणाऱ्या या सेवा पदकांसाठी पोलीस उपमहानिरिक्षक प्रमोदकुमार परसराम शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय शंकर ढोले, पोलीस उपआयुक्त संजय सुभाष चांदखेडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र रघुनाथ दिवर, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योती अरविंद देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन आबाजी माने, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास मनोहर कुंडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र कृष्णराव हिवारे यांची नावे एमएसएम या पदकासाठी आहेत. महाराष्ट्राच्या अग्नीशमन दलात भागवत श्रीराम सोनवणे, सुभाष प्रकाश जाधव, छगन ताराचंद मोरे, भागवत बबन शिंगाडे, रामचंद्र तुकाराम गोसावी यांची नावे आहेत. महाराष्ट्राच्या यादीतील जीएम पदके प्राप्त करणारे पोलीस अंमलदार मनोहर लच्छमा पेंडम, प्रकाश ईश्र्वर कनाके, अतुल सत्यनारायण येगोलपवार, हिदायत सादुल्ला खान आणि मरणोप्रांत हे पदक प्राप्त करणारे सुरेश लिंगाजी तेलामी हे आहेत. राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पोलीस महानिरिक्षक अनिल दशरथराव कुंभारे, पोलीस आयुक्त नवीनचंद दत्ता रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह प्रभुसिंह गौर हे आहेत.

नांदेड जिल्ह्यातील दोघांचा समावेश

राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकारी आणि पोलिस अंमलदारांमध्ये नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक शिवराज गंगाधर  लोखंडे आणि खंडू चांदु दर्शने यांचा समावेश आहे देशभरात  राष्ट्रपती पदक प्राप्त करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी पोलीस अमलदार आणि इतर विभागातील पदक प्राप्त लोकांचे वास्तव न्यूज लाईव्ह अभिनंदन करत आहे

केंद्र सरकारने जाहीर केलेली ही पदकांची यादी पीडीएफ संचिकेत वाचकांच्या सोयीसाठी जोडली आहे

Announcement of Medal for Gallantry (GM), President’s Medal for Distinguished Se

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!