नांदेड – केरळ राज्यातील कोची येथे झालेल्या अखिल भारतीय क्रीडा स्पर्धेत नांदेड पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू मिलींद लोणे व सुषमा लोखंडे यांनी पदक प्राप्त करुन नांदेड पोलीस दलाचा राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविला. या कामगिरीचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक केले असून दोन्ही खेळाडूंना रोख बक्षीस देऊन सन्मानीत केले. राष्ट्रीय खेळाडू व नांदेड पोलीस मुख्यालयात कार्यरत मिलींद लोणे यांनी टेबल टेनिस मध्ये पुरुष एकेरीत कांस्यपदक पटविकले तर वाहतुक शाखेतील सुषमा लोखंडे यांना देखील पदक मिळाले. या खेळाडूंचा पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी सत्कार केला व रोख बक्षीस दिले. या खेळाडूंना अति. पोलीस अधीक्षक सुरज गुरव, खंडेराय धरणे, पोलीस उपअधीक्षक (गृह) डॉ. अश्विनी जगताप यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. Kanthak Suryatal Post Views: 1,222 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हिमायतनगर येथे दरोडा, हदगाव येथे चोरी, तेहरानगरमध्ये चोरी, देवला तांडा ता.मुखेड येथे चोरी खांडल विप्र संगठन महाराष्ट्र प्रदेश चुनाव: पूर्व अध्यक्ष जयनारायण रूथला का अजीब ट्विस्ट