दिल्लीच्या लोकसभेजवळ असलेला कॉन्स्टिट्यूशन क्लब हा असा एक क्लब आहे, ज्याचा सदस्यत्व आजी आणि माजी खासदारांनाच मिळू शकतो. तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीस सदस्य होता येत नाही. या क्लबच्या निवडणुका कधी होतात, कधी संपतात, हे कोणालाच माहिती नसायचे. चार महिने आधी कोणाला या निवडणुकीबद्दल विचारले असते, तर उत्तर देणाऱ्यालाच काही वेळ लागला असता कारण गेल्या अनेक वर्षांत इथे निवडणुका झाल्याच नव्हत्या.

परंतु यंदा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निवडणुकीला मुद्दा बनवला. कदाचित त्यांच्या मनात असेल की येत्या सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होणार असल्यामुळे ते राजीनामा देतील, आणि त्यामुळे आपण पंतप्रधानपदासाठी प्रमुख उमेदवार ठरू शकू. मात्र, पत्रकार अशोक कुमार पांडे यांना असे वाटते की नरेंद्र मोदी इतक्या लवकर पद सोडणार नाहीत.समजा त्यांनी राजीनामा दिलाच आणि अमित शहा पंतप्रधान झाले, तरीही भाजपमध्ये मोठा गोंधळ होऊ शकतो. कारण अमित शहा प्रत्येक बाबतीत आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छितात. सध्या निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देखील अमित शहांच्याच पसंतीचे मानले जातात. राजकीय पक्ष असो वा संघटना, दोन्हींवर त्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
अलीकडेच इतिहासकारांचा एक कार्यक्रम या क्लबमध्ये झाला होता, जो अमित शहांना आवडला नव्हता. त्यामुळे त्यांनी क्लबवर संपूर्ण ताबा मिळवण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला क्लबचा अध्यक्ष करण्याचा डाव रचला. जेणेकरून सरकारविरोधी कार्यक्रम यापुढे या क्लबमध्ये होणार नाहीत.
या निवडणुकीत राजीव प्रताप रूडी यांनी बाजी मारली. ते अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते, आजही खासदार आहेत, आणि सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. ते व्यावसायिक पायलट असून अजूनही अधूनमधून इंडिगो कंपनीचे विमान उडवतात. त्यांच्या समोर दुसरे उमेदवार संजीव बालियान बद्दल निशिकांत दुबे, जे बोलकं व्यक्तिमत्व असून त्यांच्यावर आतापर्यंत ५५ खटले दाखल आहेत.दुबे पत्रकारांना सांगत होते की, गेल्या २५ वर्षांमध्ये कधीही या क्लबमध्ये निवडणूक झाली नव्हती. खासदारांचे महत्त्व आता संपले असून आयएएस, आयपीएस आणि व्यावसायिकांचे वर्चस्व वाढले आहे. त्यामुळे या क्लबची जुनी प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी ही निवडणूक होत आहे. त्यांनी सांगितले की, ९० वर्षांचे खासदार सुद्धा मतदानासाठी येत आहेत आणि परिवर्तन अपेक्षित आहे. हे परिवर्तन संजय बालियान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निवडणुकीत संजीव बालियान यांच्याविरुद्ध उघड विरोध करणारे नेते म्हणजे योगी आदित्यनाथ. भाजपमध्ये दोन प्रमुख अंतर्गत संघर्ष आहेत, एक म्हणजे पक्षाध्यक्ष पदासाठी, दुसरा म्हणजे नरेंद्र मोदी नंतर पंतप्रधान कोण होणार?चर्चा आहे की जे. पी. नड्डा यांना उपराष्ट्रपती पद दिले जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या माणसाला अध्यक्षपदावर बसवू इच्छित आहे, तर मोदी-शहा जोडीला असा अध्यक्ष हवा आहे जो त्यांच्याच नियंत्रणात राहील.भाजपमध्ये मोदींच्यानंतर पंतप्रधानपदासाठी प्रमुख दावेदार आहेत: योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी आणि अमित शहा. या निवडणुकीत शहा जिंकले असते, तर त्यांच्या पंतप्रधानपदाच्या आकांक्षेस बळ मिळाले असते.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठा पराभव मिळाला होता. त्या वेळी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत योगी आदित्यनाथ यांना फारसा विचारात घेतले गेले नव्हते, ज्यामुळे त्यांनी खाजगीत अमित शहांना या पराभवासाठी जबाबदार धरले होते.राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव यांना चिठ्ठीद्वारे मुख्यमंत्री करण्याचा निर्णयदेखील शहांचाच मानला जातो. मात्र उत्तर प्रदेशात शहांची चाल यशस्वी झाली नाही. त्यामुळेच ही लढाई भाजपमधील अंतर्गत संघर्षाचे प्रतीक बनली आहे.

राजीव प्रताप रूडी यांनी सांगितले की, त्यांच्या पॅनलमध्ये काँग्रेस, समाजवादी पक्ष, पीएमसी आणि अपक्ष सदस्य होते. ते म्हणाले की, हे मतदान त्यांच्या कार्याची पावती होती. मात्र राजकीय वर्तुळात हे मानले जात आहे की ही लढाई “रूडी विरुद्ध शहा” अशीच होती. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं, तर ही लढाई होती जुन्या भाजपविरुद्ध आजच्या शहांकडील भाजपची.या निवडणुकीत अमित शहांचा पराभव झाला असून, अनेकजण याला त्यांच्या राजकीय प्रवासातील “सुरुवातीचा झटका” मानत आहेत. भाजपमधील बरेच खासदार शहांच्या विरोधात असलेल्या रूडींच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे भाजपमध्ये अमित शहांच्या विरोधातील आवाज आता अधिक ठळकपणे उमटू लागले आहेत.शेवटी, पत्रकार अशोक कुमार पांडे यांच्या मते, या गुप्त मतदानात भाजप खासदारांनी अमित शहांना एक संदेश दिला आहे. भारतीय जनता पार्टीच्या पुढील सहा-आठ महिन्यांत बरेच नवे घडामोडी घडतील, हे निश्चित.
