नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 1 जानेवारी 2025 पासून सातव्या वेतन आयोगातील महागाई भत्याच्या दरात 2 टक्याची वाढ केली आहे.
श्रावण महिन्याच्या सणांच्या दिवसांमध्ये महाराष्ट्र शासनाने शासकीय नोकरांना दिलेली ही भेट आहे. वित्त विभागाचे उपसचिव विनायक धोत्रे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 2025 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतन रचनेतील मुळ वेतनावरील अनुज्ञये महागाई भत्याच्या दर 53 टक्केवरून 55 टक्के करण्यात आला आहे. सदर महागाई भत्ता 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीतील थकबाकीसह ऑगस्ट 2025 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा असे आदेश आहेत. महाराष्ट्र शासनाने आपला निर्णय संकेतांक क्रमांक 2025081122037305 प्रमाणे प्रसिध्द केला आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2 टक्यांनी वाढ
