नांदेड(प्रतिनिधी)-उद्या 14 जुलै रोजी राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे हे नांदेड येथे येत आहेत. त्यांच्या वास्तव्यात काही रस्ते वाहतुकीचीसाठी बंद करण्यात आले आहेत आणि त्या रस्त्यांना पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहेत. हे आदेश प्रभारी पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी निर्गमित केले आहेत.
दि.14 जुलै रोजी राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे हे नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच नागरीकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग सुध्दा सुचविण्यात आले आहेत.
वाहतुकीकरीता बंद असलेले मार्ग
महाराणा प्रताप चौक-वसंतराव नाईक चौक- डॉ.अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत जाण्याची आणि येण्याची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. डॉ.अण्णाभाऊ साठे पुतळा-हिंगोली गेट उड्डाणपुल-यात्रीनिवास-चिखलवाडी चौक पर्यंत जाण्या-येण्यासाठीची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. जुना मोंढा-महाविर चौक हा मार्ग जाण्या-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहिल. आयटीआय टी पॉईंट-आयटीएम कॉलेज-माधव दालमिल-डॉ.अण्णाभाऊ साठे पुतळा हा मार्ग पुर्णपणे जाण्या-येण्यासाठी बंद राहिल. जुना मोंढाजवळी नवीन पुल, जुना मोंढा-देना बॅंक चौक-वजिराबाद चौक हा मार्ग जाण्या-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहिल.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग
महाराणा प्रताप चौक ते डॉ.अण्णाभाऊ साठे पुतळ्याकडे येण्यासाठी नंदीग्राम सोसायटी-दत्तनगर हा मार्ग वापरता येईल. डॉ.अण्णासाठी साठे पुतळा ते यात्रीनिवासकडे जाण्यासाठी गोकुळनगर-हिंगोली गेट-अंडरब्रिज ते पुढे जाण्या आणि येण्यासाठी खुला राहिल. जुना मोंढा येथून वजिराबादकडे येण्यासाठी भगतसिंघ चौक-कविता हॉटेल-हिंगोली गेट अंडरब्रिज -रेल्वे स्टेशन मार्गे जाणे-येणे करता येईल. आयटीआय टी पॉईंट ते डॉ.अण्णाभाऊ साठे पुतळ्याकडे जाणारी वाहतुक कुसूमताई चौक-एस.टी.ओव्हर ब्रिज-रेल्वे स्टेशन-हिंगोली गेट अंडरब्रिज या मार्गाने जाण्या-येण्याकरीता वापरता येईल. नवीन पुलावरून वजिराबादकडे येणारी वाहतुक साईबाबा कमान-रवीनगर जुना कौठा मार्गे गोवर्धनघाट पुलावरून वजिराबादकडे येण्या-जाण्यासाठी वापर करता येईल.
14 जुलै रोजी शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद
