तीन वर्षांपूर्वीपासून विरोधव पक्ष नेते खा. राहुल गांधी सतत सांगत आले आहेत की भारत सरकारच्या धोरणांमुळे चीन आणि पाकिस्तान एकत्र येत आहेत. त्या वेळी त्यांच्यावर ‘देशद्रोही’ असे आरोप लावून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.
उपसेनाप्रमुख राहुल सिंग यांनी स्पष्ट केले की पाकिस्तान फक्त चेहरा होता, प्रत्यक्षात अनेक शत्रू सीमेवर होते. चीन पाकिस्तानच्या ८१ टक्के गरजा पूर्ण करत आहे. ते म्हणाले की, आमच्या काही शस्त्रांनी काम केले नाही, त्यांना अद्ययावत करण्याची गरज आहे.राहुल गांधी जेव्हा हेच मुद्दे मांडत होते, तेव्हा त्यांच्या विरोधात खोटा प्रचार करण्यात आला. सेनेच्या शौर्यावर मतं मागितली जातात, पण जेव्हा सैन्याचे प्रश्न मांडले जातात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वायुसेनाप्रमुख अमरप्रीत सिंग यांनी जेव्हा सैन्याच्या गरजांवर प्रश्न उपस्थित केले, तेव्हा तेही दुर्लक्षित झाले.
उपसेनाप्रमुख राहुल सिंग यांनी स्पष्ट केले की चीन आणि पाकिस्तान एकत्र काम करत आहेत. चीन पाकिस्तानला शस्त्रास्त्र आणि तांत्रिक सहाय्य देतो आहे. चीन भारताविरोधात आपली शस्त्रं थेट युद्ध न करता परीक्षण करत आहे.राहुल गांधींनी तीन वर्षांपूर्वी लोकसभेतच ही गोष्ट अधोरेखित केली होती. त्यांनी सांगितले होते की भारताची परराष्ट्र धोरणे ही पाकिस्तान आणि चीन यांना वेगळे ठेवणारी असावी, पण सरकारने त्यांना जवळ आणले आणि हे देशासाठी नुकसानकारक आहे.टर्कीने पाकिस्तानला ड्रोन दिले आहेत हे सुद्धा उप सेनाप्रमुखांनी स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान हे ड्रोन भारताच्या हद्दीत आले होते आणि काही जमिनीवर उतरले होते. हे सर्व पाहता, भारताला आता एक सक्षम आणि आधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
राहुल सिंग म्हणाले की, सी-४-आयएसआर (Communication, Command, Control, Intelligence, Surveillance आणि Reconnaissance) या सगळ्यांची एकत्रित प्रणाली असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात अधिक काम होण्याची गरज आहे.जेव्हा डीजीएमओ स्तरावर पाकिस्तानसोबत चर्चा होत होती, तेव्हा पाकिस्तानने कबूल केले की त्यांना भारताच्या काही शस्त्र प्रणालींबद्दल माहिती आहे. म्हणजेच ही माहिती चीनमार्फत लीक झाली असण्याची शक्यता आहे.
वायुसेनाप्रमुख अमरप्रीत सिंग यांनी सुद्धा म्हटले होते की, भारतीय सेनेला लागणाऱ्या वस्तूंची डिलिव्हरी अत्यंत संथ गतीने होते. “तेजस” लढाऊ विमानाची डिलिव्हरी याचे उदाहरण आहे. करार होऊनही वेळेवर साहित्य पोहोचत नाही. याचा थेट परिणाम सेनेच्या क्षमतेवर होतो.लेफ्टनंट जनरल राहुल सिंग यांनी सांगितले की, जर ऑपरेशन सिंधू दरम्यान सर्व साहित्य वेळेत मिळाले असते, तर परिणाम वेगळा असता.राहुल गांधी यांना ‘चीनचा एजंट’ म्हणणाऱ्या प्रचारतंत्रावर आता प्रश्नचिन्ह उभं राहतंय कारण त्यांनी जो इशारा दिला होता, तो आता प्रत्यक्षात खरा ठरत आहे.
जयराम रमेश यांनी आपल्या वक्तव्यात नमूद केलं आहे की, चीनने पाकिस्तानच्या हवाई दलाला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. तोच चीन लडाखमधील स्थिती बदलतो आणि त्याचबरोबर भारताशी व्यापार वाढवत राहतो.कॅप्टन शिवकुमार यांनीही सांगितले होते की, राजकीय नेतृत्वामुळेच आपल्याला काही ठिकाणी कारवाई करता आली नाही. पुलवामानंतर पंतप्रधान मोदींनी मतदारांना ‘सैन्याच्या बलिदानावर मत द्या’ असे आवाहन केले होते, पण आज जेव्हा सैन्य अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, तेव्हा त्यांच्यावर फारसा विचार होत नाही.
सीडीएस अनिल चव्हाण, उपसेनाप्रमुख राहुल सिंग आणि कॅप्टन शिवकुमार यांचे वक्तव्य केवळ राजकारणासाठी नाही, तर देशाच्या सुरक्षिततेसाठी आहेत. त्यामुळे सरकारने या विषयाकडे दुर्लक्ष करू नये.