1977 पासून राजकीय जीवनाची सुरुवात करणारे डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे वय आज 84 वर्षे आहे. ते नेहमीच परखड आणि रोखठोक बोलतात. अत्यंत विद्वान व्यक्तिमत्त्व असून अर्थशास्त्रावर त्यांची गाढा अभ्यास आहे. सध्या त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एका पॉडकास्टमध्ये केलेले वक्तव्य विचार करायला लावणारे आहे.
डॉ. स्वामी यांनी अनेकवेळा गांधी कुटुंबीयांना न्यायालयात बोलावले आहे आणि त्यांच्या कृतींमुळे काही राज्य सरकारे देखील कोसळली आहेत. सध्या ते भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यसभेत खासदार आहेत. ते मंत्रीही राहिले आहेत.अशा व्यक्तीने जेव्हा देशाच्या पंतप्रधानांवर आरोप केले, तेव्हा तो गंभीर विषय ठरतो. कारण पंतप्रधान हे सर्वोच्च पद आहे आणि त्याला एक स्वतंत्र प्रतिष्ठा आहे.
त्या पॉडकास्टमध्ये डॉ. स्वामी म्हणाले की, “लाल डोळे कोणाला दाखवले? आम्हाला दाखवले काय? पेपरवाल्यांना दाखवले. चीनला दाखवले, तर तो म्हणेल की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता, तेव्हा जे काही घडले, त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. आणि आम्ही तो व्हिडिओ समोर आणू.” ते पुढे म्हणतात की, “तुम्हाला माहित आहे ना, आम्ही (चीन) किती जवळचे होतो?”त्यांनी असा आरोप केला आहे की, चीनकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित काही संवेदनशील दस्तऐवज आणि व्हिडिओ आहेत. पत्रकार विचारतो, “अमेरिकेकडेही असे दस्तऐवज आहेत का?” त्यावर डॉ. स्वामी म्हणतात, “हो, आहेत. म्हणूनच पंतप्रधान चीन किंवा अमेरिकेसमोर काही बोलत नाहीत.”
ते म्हणतात, “युद्धविराम का होतो? कारण चीन आणि अमेरिका म्हणतात, इथे बसा, तर हे भाऊ बसतात. पाकिस्तानसोबत बसण्याची आमची तयारी नाही, पण चीन-अमेरिकेबाबत आपल्याला भिती वाटते.”पुढे ते असेही म्हणतात की, “आता तर चीन आणि अमेरिका आपल्या नावाचाही उल्लेख करत नाहीत.” प्रश्न असा आहे की, डॉ. स्वामी ज्या ‘व्हिडिओ’बद्दल बोलत आहेत, तो नेमका काय आहे?
डॉ. स्वामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी जरी वेगळी असली, तरी मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत, याची जाणीव डॉ. स्वामी यांना निश्चितच आहे.आजच्या परिस्थितीत पंतप्रधानांवर आरोप करणे म्हणजे देशाच्या प्रतिष्ठेवर आघात करण्यासारखे आहे. त्यांच्या धोरणांवर, कृतीवर टीका केली जाऊ शकते, पण ‘चीनकडे व्हिडिओ आहेत’ असा गंभीर आरोप म्हणजे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.
जर खरोखर असे दस्तऐवज किंवा व्हिडिओ असतील, तर ते समोर यायला हवेत. भारत आणि अमेरिकेचे संबंध, किंवा पाकिस्तानबद्दल वक्तव्य बदलले जाणे, ही गंभीर बाब आहे. परराष्ट्र धोरणात पारदर्शकता हवी.अमेरिका पाकिस्तानला ‘मित्र’ मानते, आणि आपण अमेरिकेला. ही कोणती नीती आहे? हजारो वर्षांपासून सांगितले जाते की, शत्रूचा मित्र म्हणजे आपला शत्रू.
आज आपण रशियासोबतचा व्यापारही तोडण्याच्या मार्गावर आहोत. आपण अमेरिकेला घाबरतो आहोत का? अमेरिकेकडे असे काय दस्तऐवज आहेत ज्यामुळे भारत सरकार किंवा पंतप्रधान दबावात आहेत?या देशाच्या 140 कोटी लोकांचा विश्वास पंतप्रधानांवर आहे. आणि जर पंतप्रधानांचा विश्वास जनतेवर असेल, तर त्यांनी खुलासा केला पाहिजे की ते ब्लॅकमेल होत आहेत की नाही. जर तसे असेल, तर देशातील प्रत्येक नागरिक त्यांच्यासोबत उभा राहील.
डॉ. स्वामी हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत. त्यांनी गंभीर आरोप केले आहेत, ते खरे असतील तर ती गोष्ट समोर यावी, आणि खोटे असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. कारण, हे कोणीही सामान्य माणूस बोललेले नाही, तर डॉ. सुब्रमण्यम स्वामी बोलले आहेत.दूधाचे दूध, पाण्याचे पाणी व्हायला हवे. न्यूज लाँचर मधील पत्रकार अशोक वानखेडे म्हणाले की, “तुमच्यावर डाग लागले नाहीत.” रामायणात जसे एक छोटा व्यक्ती आक्षेप घेतो, तशी ही कथा आहे.आम्हाला असे वाटते की, डॉ. स्वामी यांच्या वक्तव्यांचे खंडन केले पाहिजे. त्यावर भाजपने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भूमिका स्पष्ट केली पाहिजे.
जर पंतप्रधानांवर व्यक्तिगत आरोप केले जात असतील, तर त्या आरोपांना उत्तर द्यायला हवे. कारण, पंतप्रधान गप्प का आहेत? पीएमओ गप्प का आहे? भाजपचे प्रवक्ते गप्प का आहेत?जग पाहत आहे की, अमेरिका दरबारी आम्ही दरबारी झालो आहोत. जर अमेरिका सांगेल ते आपण करत असू, तर ही लक्षणीय बाब आहे. पंतप्रधान भ्रष्ट नाहीत, यावर देशातील प्रत्येकाचा विश्वास आहे. पण तरीही जर असा आरोप झाला, तर खंडन आवश्यक आहे.