नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात सुरु असलेल्या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे सरकार किनवटला जिल्हा करू शकत नाही असे भारी वक्तव्य नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी किनवटला केले आहे. याचा अर्थ प्रशासनात घडणाऱ्या सर्व घटनाक्रमांचा मोठा अभ्यास त्यांच्याकडे आहे.काही दिवसांपुर्वी हदगावचे आ.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या संदर्भाने तुम्ही तुमचे बसून मिटवून घ्या असा सल्ला आ.कदम यांना देणाऱ्या संतोष पांडागळे यांनी किनवट पत्रकार संघसमोर राजकीय मस्तीला घाबरू नका असे सांगितले. यातून त्यांची भुमिका कोणती हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सोबतच किनवट पत्रकार संघासमोर बोलतांना सर्व काही अशोक चव्हाण यांच्या मार्फत होईल हे सांगून त्यांनी भारतीय जनता पार्टीची प्रचार यंत्रणा राबवली काय? असे सुध्दा वाटते.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर संतोष पांडागळे यांचा पहिला कार्यक्रम किनवट येथे झाला आणि अत्यंत सुबक अशा लेआऊटमध्ये तयार केलेले ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला असे त्यांनी सांगितले. हे कार्ड तुम्हाला ताकत देणार आहे. याचा अर्थ काय? हेच कळत नाही. सोबतच किनवट तालुका जिल्ह्यात बदलण्याची चर्चा करतांना संतोष पांडागळे म्हणाले की, सध्या लाडक्या बहिणीची योजना जी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. त्यामुळे किनवट जिल्हा करणे शासनाला अवघड होणार आहे. ते किनवट जिल्हा करण्याच्या मागणीवर बोलत होते की, शासनाची बाजु मांडत होते. हा प्रश्न आहे. यापुढे पालकमंत्री अतुल सावे येतील तेंव्हा खा.अशोक चव्हाण, कॉंगे्रस खा.रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून किनवटला जिल्हा करण्याची मागणी आपण लावून धरु असे सांगत होते. मागणी पत्रकार संघाची आहे की, नेत्यांची हा प्रश्न यामुळे समोर आला. आपल्याला नाही तर आपल्या मुलांच्या काळत तरी किनवट जिल्हा होईल असे संतोष पांडागळे यांना वाटते. त्यांचा कार्यकाळ तर दोनच वर्षाचा आहे. मग पुढेचे अध्यक्ष सुध्दा ही मागणी लावून धरतील काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माझे मुंबईला अनेक दौरे असतात असेही ते म्हणाले. खरे तर मुंबईवाल्यांचे दौरे राज्यात असतात. पण संतोष पांडागळे यांचे दौरे मुंबईला असतात हे ऐकणाऱ्यांना नक्कीच त्यांचा हेवा वाटला असेल.
किनवट येथे जुन्या काळातील पत्रकारीता तुम्ही जीवंत ठेवतांना कै.सुधाकरराव डोईफोडे, कै.रामेश्र्वर बियाणी, कै.प्रभाकर रावते यांचा आदर्शन ठेवून आपण पत्रकारीता करत आहात. आपल्याला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. यामध्ये संतोष पांडागळे यांनी राजकीय लोकांची मस्ती, गुंडगिरी यांचा उल्लेख केला. आपला उर्दहनिर्वाह चालवितांना तुम्ही आपला व्यवसाय सांभाळून पत्रकारीतेचा बाणा जीवंत ठेवला याचा उल्लेख करत तुमची पत्रकारीता नांदेडपेक्षा अवघड असल्याचे सांगितले.
एकूणच या वक्तव्यातून संतोष पांडागळे हे माजी जिल्हाध्यक्षांपेक्षा वरचढ नक्कीच बोलतात. पण करतील काय? पाहु, करु, आपल्याला भेटेल, आपण भांडू, मागणी लावून धरु हे शब्द राजकीय आहेत. पत्रकार संघटनेमध्ये राजकारणाचा काही विषय नसतो. माजी अध्यक्ष सुध्दा कधी राजकीय बोलत नव्हते. काही जण सांगतात संतोष पांडागळे यांना नांदेडमध्ये पत्रकार भवन उभारण्याच्या आश्र्वासनावरच अध्यक्ष करण्यात आले आहे. काही जण सांगतात खा.अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांना सांगितल्यामुळेच संतोष पांडागळे यांना निवडणुक न घेता जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. यातील सत्यतेला कोणी दुजोरा देत नाही. परंतू न मानण्यासारखे पण काही कारण उपलब्ध नाही. यावरुन राजकीय विचारश्रेणी आता पत्रकार संघटनेत उतरली असेच मानावे लागेल. भविष्यात पत्रकारांना स्वत: सारखी राजकीय प्रचार करण्याची वेळ संतोष पांडागळे यांनी सदस्यांवर आणू नये म्हणजे कमावाले.