नांदेड(प्रतिनिधी)-जमीनीची होणारी धुप आणि त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याची दखल जागतिक स्तरावर सुध्दा घेणे सुरू असतांना जमाते इस्लामी हिंदच्यावतीने त्यांची संघटना चिल्डर्न्स इस्लामीक ऑर्गनायझेशन(सीआयओ) ने दखल घेतली असून माते इस्लामी हिंदची ही बालक ब्रिगेड देशभरात 1 लाख वृक्षांचे रोपण करणार आहेत. त्यात विशेष करून ज्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य जास्त असते ती ठिकाणे साफ करून त्या ठिकाणी हे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती बालक मोहम्मद आमन खान, अब्दुल हाजी आणि बालिका सय्यदा सिदराह तहरीन आणि सय्यदा महिरा मरियम यांना पत्रकारांना दिली.
जागतिक स्तरावर वृक्षारोपण हा एक मोठा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यातच सीआयओने हाती घेतलेला हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हात मातीत आणि मन देशासोबत अशा आशयाचा आहे. ही मोहिम 25 जून पासून सुरू झाली असून 26 जुलैपर्यंत सीआयओची बालके देशभरात 1 लाख वृक्षांचे रोपण करणार आहेत. लहान मुलांची भुमिका कोणत्याही कार्यक्रमात महत्वाची असते. भविष्यात प्रत्येक दिवस हिरवळ घेवून येईल अशा पध्दतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सीआयओचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन व धर्मगुरूंना आव्हान करत आहेत की, एक झाड लावा पृथ्वी वाचवा. झाड लावणारे बना आणि हिरो व्हा. नांदेड शहरात सीआयओ संघटनेचे 1 हजार सदस्य आहेत. सीआयओचे महम्मद युनूस यांनी सांगितले की, नांदेड शहरात किमान 1 हजार झाडे लावण्याचाउद्देश आहे. आम्ही या मोहिमेत अनेक शाळांना आणि इतर धर्मिय बंधूंना सुध्दा सामिल करून घेणार आहोत. ज्यामुळे याची व्याप्ती वाढेल.
या पत्रकार परिषदेत जमाते इस्लामी हिंदचे सय्यद आबेद, रईस खान, मोहम्मद युनूस यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बालक आणि बालिका बोलतांना सांगत होते की, वृक्षांची संख्या कमी होत असल्यामुळे पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. जे झाड लावतील तेच जीवन जगतील असे या बालकांना वाटते. जेंव्हा आम्ही बालके छोटेसे काम करतो. अर्थात एक वृक्षारोपण करून त्यावेळेस दररोज त्याला पाणी देवू, खत देवून आणि जेंव्हा ते झाड सेंटीमिटरप्रमाणे वाढेल तेंव्हा त्याला पाहुन आमचा आनंद द्विगुणीक होईल. आम्हाला वाटेल की, हे काम आम्ही केलेले आहे. याची जोपासने करणे आमची जबाबदारी आहे. अशा पध्दतीने वृक्षांची संख्या वाढेल आणि पर्यावरणाला आम्ही मदत करू. महम्मद युनूस यांनी सांगितले की, इतर शाळांमध्ये जावून सुध्दा आमचे सीआयओचे विद्यार्थी -विद्यार्थींनी त्या शाळांमधील इतर धर्मिय विद्यार्थी बालक आणि बालिकांना वृक्षारोपणाचे महत्व स ांगून स्वत:सोबत घेण्याचे प्रयत्न करतील. बालकांच्यावतीने जमाते इस्लामी हिंदने सुरू केलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रशंसनिय आहे.
याप्रसंगी वृक्षारोपणाची सुरूवात करतांना उपस्थितीत पत्रकारांमधील ज्येष्ठ सदस्य रामप्रसाद खंडेलवाल यांना जमाते इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष सय्यद आबेद आणि सीआयओचे उपस्थित बालक व बालिका मोहम्मद आमन खान, अब्दुल हाजी, सय्यदा सिदराह तहरीन आणि सय्यदा महिरा मरियम यांनी एक वृक्ष भेट दिला.
जमाते इस्लामी हिंदच्या चिल्डर्न्स ऑर्गनायझेशनच्यावतीने देशात 1 लाख वृक्षांचे रोपण होणार
