नांदेड(प्रतिनिधी)-कोलंबी ता.नायगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 24 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
बालाजी नारायण आचमे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जूनच्या रात्री 10 ते 28 जूनच्या मध्यरात्रीनंतर 2 वाजेदरम्यान त्यांच्या सासुरवाडीचे घर कोलंबी येथील घराचा कडी कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवलेले 27 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिणे 1 लाख 24 हजार 800 रुपयांचे चोरून नेले आहेत. नायगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 142/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.
कोलंबीमध्ये 1 लाख 24 हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी
