नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीसांनी महिलाविषयींच्या गुन्ह्यांमध्ये अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत पोलीस ठाणे उस्माननगर, पोलीस ठाणे रामतिर्थ आणि पोलीस ठाणे सिंदखेड या तिन ठिकाणी पोलीसांबद्दलच्या विचाराला उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे.
दि.26 जून रोजी सायंकाळी 5 वाजता पोलीस ठाणे उस्माननगर येथील एक 16 वर्षीय बालिका घरातून निघून गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्या बालिकेला काही तरी राग आला होता. उस्माननगर येथील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मस्के यांनी ही माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांना दिली.यानंतर सायबर सेलला माहिती देवून त्या मुलीचे लोकेशन प्राप्त केले आणि पोलीस उपनिरिक्षक गजानन गाडेकर,सुर्यवंशी, पोलीस अंमलदार वडजे, डोळे, सायबर सेलचे पोलीस उपनिरिक्षक चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या बालिकेचा शोध लावला आणि क्रांती चौक सिडको येथून मुलीला ताब्यात घेवून ती मुलगी आईच्या स्वाधीन केली. आईने उस्माननगर पोलीसांना धन्यवाद दिले आहे.
दुसरी घटना सिंदखेड पोलीस ठाण्यात घडली. यात 25 जून रोजी एका अनुसूचित जातीच्या युवतीने तक्रार दिली की, तिचा ओळखीचा सय्यद जावेद सय्यद रजाक (26) हा विनाकारण तिच्या घराजवळ चकरा मारत आहे, वाईट नजरेने पाहत आहे ही बाब युवतीच्या आई-वडीलांच्या लक्षात आल्यानंतर विचारणा करण्यात आली. तेंव्हा तो सय्यद जावेद विचारणा करू लागला. त्वरीत प्रभावाने या प्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 95/2025 दाखल झाला. पोलीस उपअधिक्षक रामकृष्ण मळघणे, सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर, पोलीस अंमलदार चव्हाण, कुमरे, मडावी, हुसेन, कदम, नरवाडे, वानखेडे, शेंडे, कांबळे, पवार, वेलदोडे, महिला पोलीस पाटील यांनी सय्यद जावेद सय्यद रजाक (26) यास अटक केली आणि पुरावे गोळा करून 24 तासाच्या आत सय्यद जावेद विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयाने सय्यद जावेदला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.
तिसऱ्या घटनेत 25 जुन रोजी रामतिर्थ पोलीस ठाण्यात तक्रार आली की, ती बालिका आपल्या घरासमोर किंवा कॉलेजला किंवा कामासाठी बाहेर जात असतांना ओमकार बळीराम खेळगे (23) हा युवक तिच्या पाठीमागे याचा, तिच्याशी जवळीग साधण्याचा प्रयत्न करायचा, तिला म्हणायचा माझ्याशी लग्न कर तु मला लई आवडतेस, तु लग्न केले नाहीस तर तुझे आई-वडील, भाऊ यांना मारुन टाकतो. या संदर्भाने रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 196/2025 दाखल झाला. पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक विक्रम हारहाळे यांनी आपले सहकारी पोलीस भवानगिरकर, उदय कुलकर्णी यांच्यासहकाऱ्यांने ओमकार खेळगेला अटक केली आणि 12 तासात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यानुसार बिलोली येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र क्रमंाक 67/2025 दाखल केले. यावर विशेष सत्र खटका क्रमांक 32/2025 असा क्रमांक देण्यात आला आहे.
नांदेड जिल्हा पोलीसातील या तिन घटनांमुळे महिला विषयक गुन्ह्यांचा तपास अत्यंत त्वरीत प्रभावाने करून योग्य न्याय दिल्याप्रकरणी नांदेड पोलीसांचे कौतुक व्हायलाच हवे.