नांदेड–जिल्ह्यातील युवा नेतृत्व आनंद (बंटी) लांडगे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची दखल घेऊन राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा ता. लोहा जि. नांदेड या संस्थेचा राजर्षी शाहू महाराज मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर झाला असून 29 जून रोजी आयोजित मराठवाडास्तरीय कवी संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सामाजिक, राजकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बंटी लांडगे यांनी विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. महापुरूषांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर, अन्नदान, अपातकालीन परिस्थितीत गोरगरीबांना मदत, मोफत ॲम्बुलन्स सेवा शिवाय सामाजिक एकोपा रहावा यासाठी विविध धर्मातील धर्मगुरूंना एकाच मंचावर बोलावून सामाजिक बांधिलकी जोपासने असे विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत. शिवाय राजकीय पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या मुलभूत प्रश्नासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून नागरिकांना नागरी सुविधा मिळवून दिल्या आहेत. शून्यातून आपली प्रगती करत समाजाला हातभार लावणारे युवा नेतृत्व आनंद (बंटी) लांडगे यांच्या कार्याची दखल घेऊन राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा ता.लोहा जि. नांदेड या संस्थेने 2025 चा राजर्षी शाहू महाराज मराठवाडा भूषण पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे. हा पुरस्कार राजर्षी शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त 29 जून रोजी शहरातील हॉटेल विसावा पॅलेस येथील आयोजित मराठवाडा स्तरीय कवीसंमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अतिशय प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू महाराज मराठवाडा भूषण पुरस्कार आनंद (बंटी) लांडगे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व आप्त, स्वकीय, मित्र मित्रमंडळी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.