नांदेड समस्यांचं नव्हे, सरकारच्या निष्क्रियतेचं शहर!

ही चित्रकृती एक तक्रार नाही ती क्रांतीची किंकाळी आहे.नांदेडकरांच्या रोजच्या जगण्यातली वेदना, तोंडावर फेकून दिलेला अन्याय आणि झोपलेल्या व्यवस्थेला जागं करण्याचा आक्रोश.
नांदेडची सत्य परिस्थिती रस्ते नाही तर मृत्यूचे सापळे आहेत! खड्‌ड्यांचा भडीमार व कामाच्या नावाखाली संपूर्ण शहरातील रस्त्याचे खोदकाम केलेले वाहतूक व्यवस्था कोलमडलेली, अपघात नित्याचे. पायवाटेवर अतिक्रमण, गुन्हेगारीत वाढ, पोलीस दलाच्या कामात नेत्यांचा आणि त्यांच्या सचिवांचा हस्तक्षेप, रोज दुचाकी चोरीच्या घटना अखेर हे सर्व त्रासदायक परिस्थीती दूर करण्यासाठी पुढाकार कोण घेणार?
विद्युत सप्लाय केव्हा ही येतो व का जातो विचारणा करण्यासाठी योग्य जबाबदार अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसतात नागरिकांना अंधारात ठेवायचं धोरणच आहे का हेच कळत नाही? गरज पडते तेव्हा लाईट बंद! आजारी मुलं, वृद्ध, विद्यार्थी सगळे हवालदिल! आधार कार्ड अपडेट करण्यासाठी फक्त एकच स्थान. राशन कार्ड असो अथवा पी आर कार्ड किंवा आणखी काही काढण्याची पाळी आली की सर्व्हर डाऊन म्हणून कामाचा खेळ खंडोबा, नागरिक त्रस्त, रुग्णालय आहे परंतु शहरापासून दुर व शहारातील श्री गुरु गोबिंदसिंघजी रूग्णालय फक्त देखाव्या करिता उपलब्ध, नावाला आहे, पण दवाखान्यात उपचार नाहीत. दवाखान्यात खाटा नाहीत, योग्य औषध पुरवठा नाही, योग्य आवश्यक डॉक्टर नाहीत, पण प्रश्न विचारला तर उत्तरही नाही.येणाऱ्या यात्रेकरूंना मुलभूत सुविधा उपलब्ध नाही, पर्यटनाच्या बाबतीत उदासीनता!
गुन्हेगार मोकाट, जनता बंदिस्त!
रोजच्या बातम्यांत चोरी, लुटमारीच्या, मारहाणीच्या घटना मध्ये वाढ परंतु प्रशासनाचे प्रयत्न अपुरे.दिवसेंदिवस नशेबाज व खंडणी बहाद्दर लोकांच्या संख्येत वाढ.पवित्र गोदावरी नदीच्या शुध्दीकरणा बाबतीत योग्य उपाय योजना फक्त कागदोपत्री पण प्रत्यक्षात मात्र काही कार्याची सुरुवात नाही.बंद कारखाने ,नांदेड बेरोजगारीचं भांडार! तरुण वर्ग भविष्या शिवाय. सरकारच्या भाषणात तरुण बळ आहेत पण प्रत्यक्षात? उपेक्षित! संचखड गुरूद्वारा बोर्डावर सरकार तर्फे संविधानने दिलेल्या अधिकाराची अन्यायकारक पायमल्ली करत गेल्या पंचवीस वर्षांपासून अतिक्रमण करून सरकारी चेअरमन पाठविण्याचा पायंडा पाडला आहे. अल्पसंख्याक शिख समाजावर उघड पणे अन्याय करत जणू अन्याय करने हा जन्मसिद्ध अधिकारच आहे हे मानत असल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिक रस्त्यावर ,नेते खुर्चीत!
आप आपल्या पोळ्या भाजण्यात मग्न, नेते आता महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेस जनतेच्या सेवा करण्याचें सोंग घेत चांगले नाटकीय शैलीत जनतेच्या कामासाठी समोर उपस्थित असल्याचे भाकीत बाकी वेळेस? गारद!लोक रस्त्यावर आम्ही जनता भिक मागत नाही हक्क मागतोय!नांदेडकरांच्या आवाजाला दाबू शकत नाही ते आता उठलेले आहेत! ही चित्राकृती जिच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष थांबवावं, अन्यथा ही जनता गप्प बसणार नाही अधिक काळ शांत राहणार नाही. महानगरपालिका व जिल्हापरिषद निवडणूक मध्ये आपली शक्ती दाखवून देतील.
-राजेंद्र सिंघ शाहू ,
इलेक्ट्रिकल ट्रैनंर अबचलनगर नांदेड 770006399

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!