नांदेड–अकाश एज्युकेशन सर्विसेस लिमिटेडने नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून देशपातळीवर पहिल्या दहा विद्यार्थ्यांत अकाशचे पाच विद्यार्थी असून नांदेड येथील शाखेचे ३० विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले आहेत. नांदेड शाखेतील समर्थ फुलपगार या विद्यार्थ्यांने देशपातळीवर १५८१ क्रमांक पटकावून मुंबई येथील केईएम वैद्यकीय विद्यालयात प्रवेश घेण्यास पात्र ठरला असल्याची माहिती अकाशचे संचालक अमितकुमार सोनी यांनी एका पत्रकार परिषदेत हि माहिती दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना सोनी म्हणाले की, देशभरात वैद्यकीय शिक्षण व प्रवेश घेण्यासाठी घेण्यात आलेल्या २०२५ या वर्षातील नीट परिक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. नीट परिक्षेत अखिल भारतीय पातळीवर अकाश एज्युकेशन सर्विसेस लिमिटेडने घवघवीत यश मिळवले आहे. घेतलेल्या नीट परिक्षेत देशपातळीवर पहिल्या दहा विद्यार्थीत ५ विद्यार्थी हे अकाशचे आहेत. आकाशच्या वतीने विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे. ५५ टक्के विद्यार्थी हे पात्र ठरले असल्याचे सांगितले.
नांदेड येथील शाखेचा नीट परिक्षेत निकाल चांगला लागला असून या शाखेचा विद्यार्थी समर्थ फुलपगार हा देशपातळीवर १५८१ क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तसेच तो मुंबई येथील केईएम वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरला आहे. २२० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. ३० टक्के विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला अकाश एज्युकेशन सर्विसेस लिमिटेडचे अनेक प्राध्यापक उपस्थित होते. नीट परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी व पालक यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.