नांदेड पोलीस परिक्षेत्रातील हॉटेल आस्थापना वेळेत बंद कराव्यात-शहाजी उमाप

नांदेड(प्रतिनिधी)-दि.9 जून ते 14 जून दरम्यान नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांमधील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने आणि पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हा शाखा यांनी स्वत: रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत फिरून हॉटेल व आस्थापना विहित वेळेनंतर उघड्या राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जारी केले आहेत.
चार जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांना पाठविलेल्या पत्रात निर्धारीत वेळेनंतर हॉटेल व आस्थापना सुरू राहतात आणि त्याकडे प्रभारी अधिकारी गांभीर्यतेने पाहत नाहीत असे नमुद केले आहे. हॉटेल आस्थापनांमध्ये बिना परवाना कोणत्याही प्रकारची मद्याची साठवण व विक्री, त्याच प्रमाणे गुटखा, पान मसाला, तंबाखु इत्यादी प्रतिबंधीत पदार्थांची विक्री होणार नाही दृष्टीकोणातून तपासणी होणे गरजेचे आहे. सर्व ठाण्यांच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी व प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षकांनी रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत आपल्या हद्दीत फिरून सर्व हॉटेल व आस्थापना विहित वेळेत बंद करतील. चार जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिक्षक हे कामकाज सुनियोजित पध्दतीने सुरू असल्याची खातर जमा करतील असे या आदेशात लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!