नांदेड – केरळ राज्यातील कोची येथे झालेल्या अखिल भारतीय क्रीडा स्पर्धेत नांदेड पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू मिलींद लोणे व सुषमा लोखंडे यांनी पदक प्राप्त करुन नांदेड पोलीस दलाचा राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविला. या कामगिरीचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक केले असून दोन्ही खेळाडूंना रोख बक्षीस देऊन सन्मानीत केले.
राष्ट्रीय खेळाडू व नांदेड पोलीस मुख्यालयात कार्यरत मिलींद लोणे यांनी टेबल टेनिस मध्ये पुरुष एकेरीत कांस्यपदक पटविकले तर वाहतुक शाखेतील सुषमा लोखंडे यांना देखील पदक मिळाले. या खेळाडूंचा पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी सत्कार केला व रोख बक्षीस दिले. या खेळाडूंना अति. पोलीस अधीक्षक सुरज गुरव, खंडेराय धरणे, पोलीस उपअधीक्षक (गृह) डॉ. अश्विनी जगताप यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
