नांदेड(प्रतिनिधी)-4 ते 5 जूनच्या 24 तासामध्ये नांदेड जिल्हा पोलीस अभिलेखात दोन घरफोड्या, दोन जबरी चोऱ्या आणि एक चोरी अशा संवर्गामध्ये संपत्ती विरुध्दचे पाच गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या सर्व गुन्ह्यांंमध्ये मिळून 9 लाख 44 हजार 150 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
सय्यद बिलाल सय्यद बशीर रा.शिवनगर यांनी दिलेल्यात तक्रारीनुसार 4 जूनच्या मध्यरात्रीनंतर 1.15 ते 4 वाजेदरम्यान त्यांच्या घरात कोणी नसतांना घराच्या गेटवरून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला. दाराचे कुलूप तोडले, आत प्रवेश करून कपाटाचे कुलूप तोडले आणि कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिणे असा 4 लाख 28 हजार 650 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 218/2025 प्रमाणे दाखल केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक साने हे करीत आहेत.
देविदास भगवान जाधव हे शासकीय सेवेतील व्यक्ती आहेत. त्यांचे घर गोविंदनगर नांदेडमध्ये आहे. दि.3 जूनच्या सकाळी 11 ते 4 जूनच्या सकाळी 9 वाजेदरम्यान त्यांचे घर बंद करून आपल्या पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीला गेले होते. घरात कोणी नाही या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि घराच्या गेटचे कुलूप तोडले, बैठकीच्या दाराचे कुलूप तोडले आणि कपाटातील 1 पाण्याची मोटार, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिणे असा एकूण 1 लाख 53 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमंाक 219/2025 नुसार दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक साखरे अधिक तपास करीत आहेत.
काकांडी येथील प्रल्हाद दिगंबर देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 जून रोजी सायंकाळी 7 वाजता संतोष जीवन देशमुख आणि ओमकार जीवन देशमुख या दोन्ही पिता पुत्रांनी बहिणीच्या मुलास माझ्या भुखंडावर का खेळतोस असे विचारून मारहाण करत असतांना येण्या-जाण्याच्या रस्त्यावर दगडे रचून रस्ता का आवडता अशी विचारणा केली असता आरोपींनी त्यांना रस्त्यावर पाडून लाथा-बुक्यांनी मारहाण करून कंबरेत दगड टाकून गंभीर दु:खापत केली आणि त्यांचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 532/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार संभाजी व्यवहारे अधिक तपास करीत आहेत.
याच गुन्ह्या विरुध्द दिगंबर विठ्ठल देशमुख, गजानन दिगंबर देशमुख आणि प्रल्हाद दिगंबर देशुमख या तिन पिता पुत्रांनी मिळून 3 जून रोजी सायंकाळी 6 वाजता शेतीच्या कारणावरून त्यांच्या घरात घुसून मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन 2 लाख 84 हजार रुपयांची बळजबरीने चोरून नेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 534/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंशमलदार पांचाळ अधिक तपास करीत आहेत.
सौ.दिव्या बालाजी शिंदे यांनी दिलेल्यातक्रारीनुसार त्या आपल्या आजोबाला सोबत घेवून स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा किनवट येथे आल्या. त्यांच्या घरकुलाचा दुसरा हप्ता जमा झाला होता. ते 70 हजार रुपये त्यांनी काढले. पर्समध्ये ठेवले आणि परत बसस्थानकामध्ये येवून सिंदगी मोहपुर ता.किनवटकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करत असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील 70 हजार रुपये रोख रक्कम दुपारी 1 ते 1.30 वाजेदरम्यान चोरले आहेत. किनवट पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 170/2025 नुसार दाखल केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार वाडगुरे हे करीत आहेत.
दोन घरफोड्या, दोन जबरी चोऱ्या, एक चोरी; 9 लाख 44 हजारांचा ऐवज लंपास
