नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील दोन सिंघम फौजदारांनी पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात 15 गोवंश जनावरे पकडली आहेत. या प्रकरणात एकूण 9 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेतील सिंघम फौजदार मिलिंद सोनकांबळे आणि महेश कोरे हे आपल्या पोलीस पथकासह सुशिलकुमार नायक यांनी सांगितलेल्या जागी 5 जून रोजी रवाना झाले. मिलिंद सोनकांबळे यांनी मिलत्तनगर भागात एक पिकऍप वाहन पकडले. त्यात कत्तलीसाठी जाणारी 8 गोवंश जनावरे भरली होती. या पिकऍप गाडीचा क्रमांक एम.एच.26 बी.ई.3398 असा आहे. या वाहनातील गोवंशांची किंमत आणि गाडीची किंमत 7 लाख 70 हजार रुपये आहे. मिलिंद सोनकांबळे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 538/2025 दाखल करण्यात आला आहे. मिलिंद सोनकांबळे यांनी पकडलेल्या पिकऍप गाडीतील दोन जण पोलीसंाना पाहुन पळून गेले आहेत.
तसेच पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांनी मुदखेड येथील कुरेशी मोहल्लामध्ये एका पत्राच्या शेडमध्ये कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेली 7 गोवंश पकडले. या 7 गोवंशांची किंमत 1 लाख 35 हजार रुपये आहे. यासंदर्भाने महेश कोरे यांच्या तक्रारीवरुन मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 99/2025 दाखल करण्यात आला आहे. दोन अनोळखी इसमांसह कुरेशी मोहल्ला मुदखेड येथील शेख इमरान शेख महेबुब अशा तिघांची नावे आरोपी या सदरात आहेत. ही कार्यवाही पोलीस अंमलदार रवि बामणे, मधुकर टानगे, लोसरवाड, बालाजी यादगिरवाड, लोणे आणि देवकत्ते यांनी केली.
एलसीबीच्या दोन सिंघम फौजदारांनी 15 गोवंश जनावरे पकडली
