भारताची पहिली फायटर पायलट महिलांपैकी एक असलेल्या शिवांगी सिंह यांच्याबद्दल एक महिना आधी अशी चर्चा झाली होती की, पाकिस्तानने त्यांना पकडलं आहे. नंतर यावर स्पष्टीकरण देण्यात आलं की ही अफवा खोटी आहे. तरीही, एक महिना उलटून गेला असतानाही सोशल मीडियावर पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित होतो आहे – शिवांगी सिंह कोठे आहेत? भारतीय सरकारनेही देशातील या शूर वीरांगनेबद्दल खुलं आणि विश्वासार्ह विधान करावं, अशी देशवासीयांची अपेक्षा आहे. सीडीएस जनरल अनिल चव्हाण यांनी नुकत्याच एका मुलाखतीत, युद्धात नुकसान झाल्याचं मान्य केलं. त्यांनी कोणतंही विशिष्ट विमान किंवा वैमानिकाचं नाव न घेता, “युद्धात नुकसान होतच असतं, पण आम्ही त्यातून काय शिकलो हे महत्त्वाचं,” असं सांगितलं. यामुळेच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. शिवांगी सिंह या उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील आहेत. त्यांनी मिग-21आणि बायसन सारख्या लढाऊ विमानांची उड्डाणे केली आहेत. स्क्वॉड्रन लीडर अभिनंदन वर्धमान यांच्यासह प्रशिक्षणही घेतले आहे. पुढे त्यांना राफेल स्क्वॉड्रनमध्ये सामील करण्यात आलं होतं. 7 मे रोजी त्या ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झाल्याचंही समोर आलं. त्यानंतरच त्यांच्याबाबत अफवा पसरली की पाकिस्तानने त्यांना पकडलं आहे – ही गोष्ट सरकारकडून खोटी असल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र, नंतरही त्यांचा ठावठिकाणा किंवा त्यांनी माध्यमांसमोर येणं झालं नाही. सीडीएस चव्हाण यांनी विमान कोसळल्याची कबुली दिली, परंतु त्यांनी याचं कारण शोधण्यात अधिक भर दिला आणि दोन दिवसांत आमच्या पायलट्सनी सर्व टार्गेट्स पूर्ण केल्याचंही सांगितलं. हे सर्व ठिक आहे, परंतु देशाला हवी असलेली एकच माहिती अद्यापही दिली गेलेली नाही – शिवांगी सिंह कुठे आहेत? या प्रश्नावर सध्या राजकारणही तापतंय. काही जण ऑपरेशन सिंदूरवरून राजकीय टीका करत आहेत, तर काहीजण भारताच्या लष्करावरच संशय घेत आहेत. काही अतिशयोक्तिपूर्ण आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत – त्यात आपण अडकू नये. आपली केवळ एकच मागणी आहे – शिवांगी सिंह सुरक्षित आहेत का? आणि त्या भारतात आहेत का? हे सरकारने स्पष्टपणे जनतेसमोर आणावं. जर त्या भारतात असतील, तर त्यांना एकदा तरी माध्यमांसमोर आणावं, जेणेकरून देशवासीय निश्चिंत होतील की भारताची ही वाघीण सुरक्षित आहे.ही विनंती आम्ही शासनाला करत आहोत. वाचकांना यावर काय वाटतं, त्यांनीही आपली मते मांडावीत. Kanthak Suryatal Post Views: 1,365 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एलसीबीच्या दोन सिंघम फौजदारांनी 15 गोवंश जनावरे पकडली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारी चांडाळ चौकडी कार्यरत