पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी 10 पोलीस निरिक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 37 पोलीस उपनिरिक्षकांना परिक्षेत्रात दिल्या बदल्या; काहींना एक वर्षाची मुदतवाढ

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या परिघात येणाऱ्या नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यातील 10 पोलीस निरिक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 37 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्याचे आदेश पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जारी केले आहेत.
बदल्या करण्यात आलेल्या दहा पोलीस निरिक्षकांमध्ये नांदेड येथून जाणारे पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती दिली आहे. नामदेव बालाजी रिठ्ठे-परभणी, विनोद मनोहर मैत्रेवार, विश्र्वनाथ किशनराव झुंजारे-लातूर. नांदेडला येणारे पोलीस निरिक्षक पुढीलप्रमाणे आहेत. त्याची जुनी नियुक्ती त्यांच्या नावासमोर लिहिली आहे. संजीवन विठ्ठलराव मिरकले-लातूर, सुर्यमोहन बोलमवाड-परभणी, चितांबर शंकर कामठेवाड-परभणी, परभणी येथून लातूरला जाणारे दोन पोलीसा निरिक्षक पुढीलप्रमाणे आहेत. बालाजी महादु मोहिते आणि बुध्दीराज ज्ञानोबा सुकाळे. परभणी येथील शरद सुभाष मरे यांना हिंगोली जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. तसेच लातूर येथील गणेश नारायण कदम यांना परभणी जिल्ह्यात पाठविले आहे.
बदल्या करण्यात आलेले 28 सहाय्यक पोलीस निरिक्षक पुढीलप्रमाणे आहेत. त्यात नांदेड येथून इतरत्र जाणारे बालाजी भानुदास गायकवाड, आजिनाथ भिमराव पाटील, मुंजाजी नामदेव दळवे-परभणी, श्रीनिवास कंठीराम राठोड, भालचंद्र पद्माकर तिडके, संतोष वामनराव केदासे-लातुर, शंकर भागचंद डेडवाल-हिंगोली, नांडेमध्ये काही सहाय्यक पोलीस निरिक्षकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यात संजय धोंडीराम निलपत्रेवार, दुर्गा बालाजीराव बारसे, संकेत वसंतराव दिघे, महादेव शिवाजी पुरी, राजू दत्तराव वटाणे असे आहेत. परभणी येथील संदीप आनंदराव बोरकर, लातूर येथील भाऊसाहेब बाबासाहेब खंदारे, प्रविण मनोहरराव राठोड, भिमराव शंकर गाकवाड यांनाही एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
परभणी येथून प्रभाकर श्रीराम कवाळे, नरसींग गणपती पोमनाळकर आणि लातूर येथील मोहम्मद रियाज मोहम्मद मुनीर शेख यांना नांदेडला पाठविले आहे. परभणी येथील विक्रम हनुमंत हराळे यांना नांदेड आणि लातूर येथील दिपाली विश्र्वास गिते यांना परभणी येथे पाठविण्यात आले आहे. इतर काही सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पुढीलप्रमाणे बदल्या देण्यात आल्या आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. मुक्तार जाफर सय्यद, कृष्णा भागिनाथ धायवट-परभणी(लातूर), नाना दिपक लिंगे-नांदेड(लातूर), प्रभाकर उल्हास कापुरे-परभणी (लातूर), नृसिंहराम आनलदास, विशाल पांडूरंग वाठोरे-लातूर(नांदेड), बालाजी गोविंदराव महाजन-हिंगोली(नांदेड).
बदल्या करण्यात आलेल्या 37 पोलीस उपनिरिक्षकांमध्ये नांदेड येथून बदलून जाणारे पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. प्रकाश निळकंठराव कुकडे-परभणी, अमर सुरेश केंद्रे, मुक्तीराम नागनाथ चेवले-नांदेड (परभणी), राम राघोजी जगाडे, नारायण मारोती शिंदे-नांदेड(परभणी), रामधन महादेव डोईफोडे-परभणी(लातूर), विजय लिंगूराम पंतोजी, सुर्यकांत काशिनाथ काठोडे,भारत पंडीतराव सावंत, सुदर्शन रमेश इंगोले, शंकरराव रावसाहेब देशमुख, गौतम हनुमंतराव वाहुळे, सचिन सुधाकरराव सोनवणे, प्रशांत नागोराव जाधव, हेमंत दत्तोपंत देशपांडे-परभणी (नांदेड), मुजाहिद खुर्शीद शेख, मिनाक्षी पांडूरंग राखोंडे-परभणी(हिंगोली), पुंडलिक ज्ञानोबा मोहिते-परभणी, माजीद इब्राहिम मोहम्मद-हिंगोली(परभणी), टोपाजी एकनाथ कोरके-लातूर, मारोती गोपाळराव सोनकांबळे-हिंगोली (नांदेड), उमेश गौतम रायबोळे, आनंद मारोती बिचेवार, गोपाळ चंद्रपाल इंद्राळे-नांदेड,(लातूर), भूषण बाळासाहेब कांबळे-नांदेड, नागनाथ धोंडीराम पाटील-परभणी (हिंगोली), संदीप गंगाधर यामावार-हिंगोली (नांदेड), महेंद्रकुमार शामराव पोलवार-परभणी (नांदेड), विश्र्वजित रामचंद्र रोडे-नांदेड(परभणी). काही पोलीस उपनिरिक्षकांन एक वर्ष मुदतवाढ देण्याात आली आहे. ते पुढील प्रमाणे आहेत. आशिष सिताराम बोराटे, दामिनी लिंबाजी ननवरे, योगेश बाबुराव बोधगिरे, बाबु म्हैसाजी शिंदे, बालाजी केशवराव नरवटे-नांदेड, राजेश रावणराव जाधव-परभणी, शेख आयुब शेख गफुर साहब-लातूर, शामल रावसाहेब देशमुख-लातूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!