नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी एका गुन्ह्याचा तपास करतांना पाच चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 18 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 26 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
दि.16 एप्रिल 2025 रोजी सुनिल शेळके यांची दुचाकी गाडी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करतांना पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे, पोलीस उपनिरिक्षक नरेश वाडेवाले, पोलीस अंमलदार गजानन किडे, विशाल माळवे, पठाण, सायबर सेलचे पोलीस उपनिरिक्षक मारोती चव्हाण, पोलीस अंमलदार दिपक ओढणे, इतवारा उपविभागाचे अर्जुन मुंडे आणि श्रीराम दासरे यांनी माधव शंकरराव राजेगोरे (21) रा.सेलगाव ता.अर्धापूर, संतोष सुधाकर बंगाले (21) रा.तळेगाव ता.उमरी, बालाजी शंकरराव राजेगोरे रा.सेलगाव ता.अर्धापूर, आत्माराम उर्फ भैय्या बालाजी कदम(19) रा.सेलगाव ता.अर्धापूर, मंगेश संजय लोमटे (20) रा.चुंचा ता.कळमनुरी जि.हिंगोली या सहा जणांना पकडले. या सर्वांकडून एकूण 26 चोरीच्या दुचाकी गाड्या 18 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
भाग्यनगर पोलीसांनी 18 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 26 दुचाकी जप्त केल्या
