गोवा टुर अपडेट; हिंगोलीवरून आलेल्या पत्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-लोकशाहीतील “कमल’ आमच्या बातम्या चुकीच्या आहेत मी गेलोच नव्हतो असे म्हणत आहे. त्यांनी बहुदा बातमीच वाचली नाही. आम्ही त्यांनी गेल्याचे लिहिले नव्हते. दुसरा एक हिंगोलीतून आलेला पत्रकार गेला नव्हता. परंतू मोदकांच्या प्रसादाचा भागीदार तो नक्कीच आहे. आज अमित शाह येणार आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या मागे सगळेच मोदक प्रसादाचे भक्त पत्रकार फिरत होते. त्यात या दोघांचाही सहभाग आहे. वर्तमान पत्रामध्ये आलेल्या जाहीरातीवरून हे तर नक्कीच आहे की, पत्रकार भाजप प्रवक्त्या मागे फिरतच होते.
काही दिवसांपुर्वी आम्ही पत्रकारांच्या गोवा टुरची बातमी प्रकाशीत केली होती आणि तो टुर 40 मोदकांमध्ये प्रायोजित होता आणि प्रायोजक नव्यानेच देशपातळीवरील नेते होते. त्यानंतर लोकशाहीतील कमल मात्र आमच्या बातम्यावर चुकीच्या टिपण्या करून आम्ही खोटे लिहिल्याचे दाखवत आहे. त्याने लिहिलेल्या एका वाक्यात मी गेलोच नव्हतो असे शब्द आहे. बहुदा त्यांनी आमची बातमीच पुर्ण वाचली नाही. परिक्षेमुळे ते गेले नव्हते हे आम्ही त्या बातमीतच लिहिलेले आहे. त्यांनी आपले दहा मोदक बाजूला घेवून टाकले होते.
असाच दुसरा पत्रकार सुध्दा गेला नव्हतो. तो हिंगोली येथून आलेला आहे आणि नांदेडमध्ये कार्यरत आहे. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार वरिष्ठ पातळीवरून त्या पत्रकाराने घेतलेल्या 10 मोदकांची सुध्दा चौकशी सुरू झाली आहे. मोदके कोणी किती घ्यावीत, कोणाकडून घ्यावीत, काय सांगून घ्यावीत, कोणत्या स्वरुपात घ्यावीत. या संदर्भाने आम्हाला काही एक देणे-घेणे नाही. परंतू पत्रकारीतेचा धर्म विसरुन काम करण्याविरुध्द आमचा नक्कीच आक्षेप आहे आणि त्या आक्षेपामुळेच आम्ही मागची बातमी प्रसारीत केली होती. त्या बातमीवर लोकशाहीच्या कमलाची सुध्दा चौकशी झाली. परंतू त्याने वरिष्ठांना बनवा बनवीची उत्तरे देत आमच्या विरुध्द आग टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही यासाठी तयार आहोत की, आमचे शोधा, आमचे लिहा, आमचे दाखवा. हे आम्ही आजच लिहित नाही. यापुर्वी सुध्दा अनेकदा लिहिले आहे आणि आजही आम्ही त्यावर कायमच आहोत.
काल अमित शाहचा दौरा लक्षात घेवून अनेक पत्रकार भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे फिरत होते. याचा अंदाज जाहिरातीसाठी असेल. हे आज वर्तमान पत्र पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसते. पण या पाठीमागे फिरण्याच्या गोतावळ्यात लोकशाहीचा कमलही होता आणि हिंगोली येथून नांदेडला आलेला पत्रकार सुध्दा होता. आता हे असे लिहिले तर जाहीरातीसाठी आम्ही गेलो असे म्हणण्यास जागाच नाही. त्यांच्यासाठी जी जाहिरात लागते त्यासाठीचे मोदक नांदेड भाजपचा प्रवक्ता देवूच शकत नाही. भाजप प्रवक्त्याच्या कार्यालयात सीसीटीव्ही आहेत. ज्यांना पाहायचे असतील त्यांनी आमच्या बातमीची शाहनिशाह करण्यासाठी ते सीसीटीव्ही फुटेज पाहावेत म्हणजे आम्ही तेथे गेलेल्या पत्रकारांबद्दल लिहित आहोत हे खोटे नाही हे आपोआपच सिध्द होवून जाईल.

संबंधीत बातमी…

लोकशाहीमधील “कमल’ चा असाही प्रकार; ऑफीस मिटींगच्या नावाने लोकप्रतिनिधीकडून गोवा टुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!