ग्वालियरमध्ये उच्च न्यायालयाच्या परिसरात आज विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आल्यानंतर तो गाडीतूनच उतरू दिला नाही. यामुळे विरोधक आणि आंबेडकर विचारांचे वकील यांच्यात बरीच चर्चा झाली. हे प्रकरण पुढे भारताचे सरन्यायाधीश न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या समक्ष पाठविण्यात आले आहे. परंतू काळा कोट परिधान करून ज्या संविधान लेखकाविरुध्द वाद झाला हा वाद नक्कीच चुकीचा आहे.

मध्यप्रदेशच्या ग्वालियर उच्च न्यायालयाच्या परिसरात काल विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणण्यात आला तेंव्हा काळे कोट घालून काही वकीलांनी त्यास विरोध केला. एक वकील सांगत होते भिम आर्मीवाल्यांनी सांगितले होते की, आम्ही आज पुतळा बसविणारच. पण आम्ही येथे आले आहोत. भिमआर्मीची मंडळी कोठेच दिसत नाही. या पुतळा स्थापनेसाठी भिमआर्मीच्यावतीने अत्यंत शांतते प्रदर्शन करण्यात आले.
भारतीय संविधानाचे लेखक, निर्माते, विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात सुध्दा आहे. भारतीय संसदेची नवीन इमारत तयार झाली तेंव्हा अगोदर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा समोरच्या भागात होता. परंतू नवीन इमारतीत त्या पुतळ्याचे विस्थापन इमारतीच्या मागे करण्यात आले. लोकसभेत आंबेडकर..आंबेडकर.. आंबेडकर असे शब्द उच्चारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा केलेला अपमान भारतभर पसरला होता. त्या विरोधात आंबेडकर विचारांच्या लोकांनी देशभर केलेला विरोध गाजला होता. तरी पण गृहमंत्री अमित शाह यांनी माझे चुकले असे सांगितलेच नाहीत. त्या संदर्भाने आजही एका न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष झाली आहेत. डॉ. आंबेडकरांनी संविधानात जातीवाद समाप्त करून सर्वांना बरोबरीचे अधिकार परिधान केलेले आहेत. भारताच्या मौलिक अधिकारांवर अतिक्रमण करून संसदेत अनेक नवनवीन कायदे तयार केले जात आहे.. त्यामुळे भारताच्या संविधानाला नक्कीच ठेच लागते आहे.
त्यात ग्वालियर उच्च न्यायालयाच्या परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्याची मंजुरी पुर्वीच झाली असणार. त्या मंजुरीनंतरच पुतळा उभारणी तयार झाली असेल आणि आता पुतळा तयार असतांना काळा कोट घालणाऱ्यांनीच त्याचा विरोध करावा हे किती दुर्देव आहे ना. हेच वकील मंडळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानातील परिच्छेदांचा वापर करून पक्षकारासाठी भांडतात आणि त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करावा हे अत्यंत दुर्देवी आहे. अमेरिकेच्या कोलंबिया युनिर्व्हसीटीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरीस्टर ही पदवी प्राप्त केली. आपल्या येथील अत्यंत प्रतिभावंत विद्यार्थी म्हणून युनिर्व्हसीटीने त्यांचा पुतळा तेथे उभारला आहे. मग ग्वालियरच्या काही वकीलांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात कशाची लाज वाटते. हा वाद ग्वालियर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती स्वत: समोर आल्यानंतर सुध्दा मिटला नाही. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या समक्ष गेला आहे. ते यात काय निर्णय घेतील हे काही दिवसात कळेलच.
