नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने एकाच दिवशी सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्हे दाखल केले. हे सर्व गुन्हे अवैघ वाळुच्या संदर्भाचे आहेत. सोनखेड पोलीसांनी पण मागच्या ऑगस्ट 2024 पासून भरपूर गुन्हे दाखल केले आहेत. ते सुध्दा अवैध वाळूच्या संदर्भाचेच आहेत.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 116 ते 119/2025 असे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अवैध वाळू उपसा संदर्भाने गुप्त माहितीद्वारांकडून माहिती घेतली असता पेठसांगवी (कपिलेश्र्वर) गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा होत आहे. त्यानुसार 16 मे रोजी पहाटे 4 वाजता स्थानिक गुन्हा शाखेचे सिंघम पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने आणि पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार रवि बामणे, शंकर म्हैसनवाड, सुरेश घुगे, मधुकर डोनगे, बालाजी यादगिरवाड, देवकत्ते, बामणे, घेवारे, लोणे, दादाराव श्रीरामे, सोनखेड येथील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गिते, पोलीस अंमलदार ज्ञानोबा कौठेकर, नागरगोजे, कवाळे आदींनी कपिलेश्र्वर गाठले. तेथे नदीपात्रात वाळू उपसा करणारे 8 इंजन, किंमत 24 लाख रुपये, 46 तराफे, किंमत 11 लाख 50 हजार रुपये, तिन हायवा गाड्या 1 कोटी 35 लाख 70 हजार रुपयांच्या आणि 35 ब्रास वाळू, किंमत 1 लाख 75 हजार रुपयांची असा एकूण 1 कोटी 72 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील तराफे जाळून नष्ट केले. या 4 गुन्ह्यांमध्ये 11 आरोपी करण्यात आले ओहत. त्यांची नावे देविदास बापूराव सोनटक्के, नागनाथ बाबाराव लुटे, कृश्णा लुटे, रा.शेवडी(बा) ता.लोहा जि.नांदेड, रामेश्र्वर सखाराम गवते, अनिल घोडके , मंगेश राजाराम आव्हाड, अमोल देविदास गवते, अमोल रोहिदास गवते, राजू पंढरी गवते रा.पेनुर ता.लोहा, गोविंद वानखेडे रा.बेटसांगवी ता.लोहा, विजय शिवाजी राठोड रा.काशिराम तांडा ता.कंधार अशी आहेत. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी या सर्व पथकाचे कौतुक केले आहे.