नांदेड(प्रतिनिधी)-बसस्थानक आपल्या पुर्वीच्या जागेवर आल्यानंतर सुध्दा चोरट्यांचा प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणे सुरूच आहे. 16 मे रोजी एका महिलेचे 75 हजार रुपयांचे गंठण चोरट्यांनी लांबले आहे.
काठेवाडी ता.देगलूर येथील अंतेश्र्वर केरबा यांनी दिलेल्या तक्रारीचा दि.16 मे रोजी दुपारी 3.30 वाजता नांदेड बसस्थानकात देगलूरकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करीत असतांन गर्दीचा फायदा घेवून कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील 75 हजार रुपयांचे सोन्याचे गंठन चोरले आहे. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 215/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे अधिक तपास करीत आहेत.
बसस्थानकात महिलेचे 75 हजारांचे गंठण चोरले
