पहलगाम हल्ल्यातील मयत अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांनी केलेल्या वक्तव्यावर काही विषधाऱ्यांनी त्यांच्याविरूद्ध केलेल्या ट्रोलिंगमधील शब्द लिहिण्याची आमची ताकद नाही. असाच प्रकार आता विदेश मंत्री विक्रम मिसीर आणि त्यांच्या सुपूत्रीबद्दल सुरू झाला आहे. कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने याचा निषेध तर केलाच नाही पण एक शब्दही बोलले नाही. तुम्ही त्या शिवीगाळ करणाऱ्यांविरूद्ध बोलत नाहीत, म्हणजे त्या शिव्या तुमच्या संमतीने दिल्या जात आहेत काय. विक्रम मिसीर हे निर्णायक व्यक्ती नाही. त्यांनी फक्त जाहीर केले की युद्धविराम झाला आहे. खरे तर ज्यांनी निर्णय घेतला त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर अत्यंत अश्लिल शिव्यांमध्ये गरळ ओकणाऱ्यांविरूद्ध कार्यवाही करायला हवी आहे. आयपीएस संघटना आणि ब्युरोक्रेंट्स ऑफ इंडिया या संघटना मात्र विक्रम मिसीरच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. या सर्व ट्रोलिंगमुळे भारत देशाबद्दल जगात पसरणारा संदेश तरी लक्षात घ्या आणि शिवीगाळ करणाऱ्यांविरूद्ध कार्यवाही करा.

सेल्फी विथ डॉटर हा शब्दसमुह नरेंद्र मोदी यांनीच पुढे आणला होता. आणि त्या आधारावर काही वर्षांपुवी भारताचे विदेश मंत्री विक्रम मिसीर यांनी आपल्या पत्नी आणि मुलीसोबत घेतलेली एक सेल्फी त्यांच्या सामाजिक संकेतस्थळावर होती. हा जुना फोटो आहे, परंतु या फोटोखाली स्क्विट न्युयोन या नावाने प्रसारीत होणाऱ्या एका सामाजिक संकेतस्थळावर मुळ नाव चंदनकुमारसिंह असलेल्या व्यक्तीने विक्रम मिसीरचे मुलगी वायर या संकेतस्थळावर लेख लिहिते असे लिहून त्यांना अत्यंत घाणेरेड्या शब्दांत शिवीगाळ केली आहे. याच चंदनकुमारसिंह चा इतिहास खुप जुना आहे. तो मुस्लिम मुलींना, मुस्लिम पत्रकारांना, जे पत्रकार सरकारला प्रश्न विचारतात त्यांना शिवीगाळ करण्याचा कारभाराच चालवतो. त्याच्या फॉलोवर्समध्ये 1,29,382 लोकांचा समावेश आहे. ही किती दुर्देवाची बाब आहे ना की, म्हणजे लोकांना शिव्या आवडतात. असो लिहिणारा घाणरेड्या, वाचणारे घाणरेडे, त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या त्यापेक्षा घाणरेड्या हा सर्व प्रकार उघड केला मोहम्मद जुबेर यांनी. परंतु विदेशमंत्री एस. जयशंकर सुद्धा यावर काही बोलले नाही. ते स्वत: कधी ब्युरोक्रॅट होते. मग त्यांना तरी आपल्या विभागाच्या सचिवाला आणि त्यांच्या मुलीला होणाऱ्या ट्रोलिंगवर राग यायला हवा होता. पण असे घडले नाही. यापेक्षा या देशात काय वाईट घडेल. भारतीय जनता पार्टीच्या कोण्या नेत्याला शिवी देऊन पाहा त्याचे उदाहरणे नेहा राठोड, डॉ. मेडूसा आहेत. आज नेहा राठोड तुरूंगात आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे, 4 पीएम हे चॅनल बंद करण्यात आले. असेच करणार आहात काय मग. यालाच लोकशाही म्हणायचे काय.

आज दुरदर्शनमध्ये एक पत्रकार आहे, त्यांचे नाव दिलीप मंडल. कधीकाळी पाणी पिऊन पिऊन नरेंद्र मोदीबद्दल वाईट वाईट बोलले आहेत, गौतम अदानीची तर दिलीप मंडल यांनी वाट लावली. पण काहीतरी रहस्यमय खेळी करून दिलीप मंडल आता सरकारच्या चॅनलमध्ये आले म्हणून सरकारचे गोडवे गात आहेत. आणि ते दिलीप मंडल स्क्वीटन्यूयोनचे फॉलोअर आहेत. आता ते म्हणतील हा माझ्या स्वातंत्र्याचा विषय आहे. परंतु शिवीगाळ करणाऱ्यांची फोलोअरचीशीप घेणे हा योग्य प्रकार आहे का.
विनय नरवाल मरण पावल्यानंतर फक्त चार दिवस पत्नी हे पद सांभाळलेल्या हिमांशी नरवालने त्या घटनेविषयी बोलताना सांगितले, ज्यांनी हा घटनाक्रम घडवला त्यांना शिक्षाच व्हायला हवी, परंतु इतर मुस्लिम आणि काश्मिरी मुस्लिम यांना टार्गेट करू नका. त्यांच्याविरूद्धही अशीच गरळ ओकणारे तयार आणि बाईने आपला नवरा चार दिवसांत खाल्ला अशा शब्दांत त्यांना ट्रोल केले. शब्द यापेक्षाही घाणेरेडे आहेत पण त्यांना लिहून आम्ही आमची पातळी खालू आणू शकत नाही. खरे तर विक्रम मिसीर आणि त्यांच्या सुपूत्रीला शिवीगाळ करणाऱ्याची ओळख पटली आहे. केंद्र शासनाकडे सीबीआय, ईडी, सायबर सुरक्षा असे अनेक विभाग आहेत. त्याला जेलमध्ये टाकायला हवे कारण त्याने उच्चपदस्थ असलेला भारतीय अधिकाऱ्यावर केलेली ही ट्रोलिंग अत्यंत दु:खदायक आहे. भारत सरकारने तर नेहा राठोड, डॉ. मेडूसा यांना टार्गेट केले. नेहा राठोड तर सध्या जेलमध्ये आहे. 4 पीएम चॅनल बंद करायला लावले कारण ते तुम्हाला प्रश्न विचारतात. पण शिवीगाळ करणाऱ्यांविरूद्ध तुम्ही काही करणार नाही.

अखिलेश यादव सांगतात की, अत्यंत निंदनीय आणि लाजीरवाणी बाब आहे की, भारताच्या अधिकाऱ्यांवर असा हल्ला होत आहे. असे होत राहिले तर चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल खचेल. भाजप सरकार आपल्या अपयशाला लपविण्यासाठी लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी असे करत असेल असाही आरोप अखिलेश यादव यांचा आहे. भारतात विष पसरविणाऱ्यांचे काही होत नाही, पण भारतीय जनता पार्टी याबद्दल गप्प राहिल तर त्यांच्या समर्थनानेच असे घडवले जात आहे, असे मानले जाईल. हे मत अखिलेश यादव यांचे आहे. सचिन पायलट यांनी मिसीर कुटूंबियांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. भारतातील नेते मल्लिकार्जुन खरगे यांना गद्दार म्हणणाऱ्या पत्रकारावर काही कारवाई झाली नाही. राजोरीत सेना मुख्यालयावर हल्ला झाला अशी बातमी देणाऱ्या पत्रकारावर काही कारवाई झाली नाही, भारतीय सैन्य पाकिस्तानात घुसले असे स्टुडिओमध्ये ओरडून ओरडून आणि उड्या मारून मारून सांगणाऱ्या पत्रकाराच्या गळ्यात आता प्रॉब्लेम झाली आहे, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. कारण ते सरकारेच गुणगान करणारे लोक आहेत. परंतु आयपीएस संघटना, ब्युरोक्रॅट्स ऑफ इंडिया ह्या दोन्ही संघटना विक्रम मिसीर यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत, परंतु भारत सरकार, विदेश मंत्रालय, भारतीय जनता पार्टी, विक्रम मिसीरच्या ट्रोलिंगबद्दल काही बोलत नाहीत, यामुळे भारताच्या संदर्भाने जगात कोणता संदेश चालाला आहे, याचा विचार करण्याची गरज आहे.

